मोठी बातमी : व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरूणीवर वारंवार अत्याचार; चौघांवर गुन्हा दाखल !

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तरूणीचे अश्लिल छायाचित्र आणि व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी देवून तिच्यावर वारंवार अत्यााचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात २० वर्षीय तरूणी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सध्या ती शिक्षण घेत आहे. दरम्यान, मंगलाकर उर्फ सुदाम संभाजी कोळी वय ३०, राहूल सुनिल चौधरी वय-२८, सतिष रघुनाथ नाईक उर्फ चव्हाण वय-२८ तिघे रा. शेंदुर्णी आणि गणेश संजय सोनवणे रा. मध्यप्रदेश या चौघांनी तरूणीला तिचे अश्लिल फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. यातील संशयित आरोपी सुदाम संभाजी कोळी याने पिडीत तरूणीवर मार्च २०२३ ते १८ ऑक्टोर २०२३ दरम्यान वेळोवेळी अत्याचार केला. तसेच राहूल चौधरी, सतिष नाईक, गणेश सोनवणे यांनी पिडीत तरूणीला अनवान्टेंड गोळ्या देवून सुदाम कोळी याला मदत करत होते. हा प्रकार सहन न झाल्याने अखेर पिडीत तरूणीने बुधवार ३ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी मंगलाकर उर्फ सुदाम संभाजी कोळी वय ३०, राहूल सुनिल चौधरी वय-२८, सतिष रघुनाथ नाईक उर्फ चव्हाण वय-२८ तिघे रा. शेंदुर्णी आणि गणेश संजय सोनवणे रा. मध्यप्रदेश यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील हे करीत आहे.

Protected Content