पहूर येथील ‘त्या’ पाचही रूग्णांना होम क्वॉरंटाईनचा सल्ला

पहूर, ता. जामनेर रवींद्र लाठे । येथे कोरोना विषाणूच्या संसर्गावरून जिल्हा कोविड रूग्णालयात दाखल करण्यात आलेल्या पाचही रूग्णांना तपासणीनंतर होम क्वॉरंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, पहूर लेले नगर व पहूर कसबे भागातील पाच जणांना पहूर रुग्णालयात प्राथमिक तपासणी दरम्यान कोरोणा सदृश्य लक्षणे आढळून आले होते. यात एका महिलेचा समावेश आहे. या पाच जणांना जळगाव कोवीड रुग्णालयात चाचणी साठी रवाना करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ हर्षल चांदा यांनी लाईव्ह ट्रेन्डस न्युज शी बोलताना दिली होती.
यातील चार बाहेरून आलेले तर एक महिला गावातीलच होती.

या पाचही रूग्णांना खबरदारीचा उपाय म्हणून पुढील चाचणी साठी जळगाव कोवीड रुग्णालयात पाठविण्यात आले होते. याची माहितीही जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांना यांना देण्यात आल्याचे डॉ चांदा यांनी सांगितले होते. या पाचही जणांना जळगांव येथील कोवीड रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. तपासणी नंतर या पाचही जणांना होमकॉरंटाईन चा सल्ला देण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल चांदा यांनी सांगितले आहे.

ग्रामपंचायत तर्फे निर्जंतुकीकरणासाठी फवारणी

दरम्यान काल रोजी पहूर लेले नगर व पहूर कसबे भागातील पाच जणांना पहूर रुग्णालयात प्राथमिक तपासणी दरम्यान कोराना सदृश्य लक्षणे आढळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पहूर कसबे ग्रामपंचायतीने लेले नगर भागात निर्जंतुकीकरणाची फवारणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायत प्रशासनातर्फे खबरदारीचा उपाय करण्यात येत असला तरी येथील बहुतांश ग्रामस्थांनी लॉकडाऊनचे पालन न केल्यामुळे रस्त्यांवर गर्दी दिसून येत आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांना पहूरकरांनी साथ देण्याची आवश्यकता असल्याचे दिसून येत आहे.

Protected Content