राज्यातील चित्र बदलतेय : शरद पवार

मुंबई प्रतिनिधी । विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील चित्र बदलत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

बोदवडच्या तत्कालीन बीडीओंची चौकशी

बोदवड प्रतिनिधी । आमदार चंद्रकांत पाटील यांनी मागणी केल्यानंतर बोदवड येथील तत्कालीन गटविकास अधिकारी रमेश ओंकार वाघ यांची चौकशी करण्यात आली आहे.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांची हॅटट्रीक

औरंगाबाद । मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांनी दणदणीत विजय संपादन करून विजयाची हॅटट्रीक केली आहे.

साकेगावचे ग्रामविकास अधिकारी निलंबीत; निधीत अपहार केल्याचा ठपका

साकेगाव, ता. भुसावळ प्रतिनिधी । येथील ग्रामविकास अधिकारी गौतम आधार वाढे यांनी गावातील कर स्वरुपात जमा झालेली रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यात भरणा न करता परस्पर खर्च केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना निलंबीत करण्यात आले आहे.

सिव्हीलमध्ये लवकरच नॉन-कोविड रूग्णांवरही होणार उपचार ! ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात लवकरच नॉन-कोविड रूग्णांवर उपचार होणार असून याबाबत प्रशासनाने तयारी सुरू केली असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली आहे.

फेस मास्क आवश्यक : आरोग्य संघटनेतर्फे नवीन दिशानिर्देश जारी

नवी दिल्ली । जगभरात कोरोनाचा प्रकोप कमी झालेला नसतांना जागतिक आरोग्य संघटनेने याचा संसर्ग टाळण्यासाठी फेस मास्क आवश्यक असल्याचे सांगत, याबाबतचे नवीन दिशानिर्देश जारी केले आहेत.

अमरीश पटेल यांचा दणदणीत विजय

धुळे प्रतिनिधी । धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे अमरीश पटेल यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे. त्यांचा विजय निश्‍चि झाला असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे.

खडसेंना कोणतेही काम उरलेले नाही : दरेकरांची टीका ( व्हिडीओ )

मुंबई प्रतिनिधी । खडसे यांना सध्या कोणतेही काम उरलेले नसून नवीन पक्षात गेल्यानंतर आपण काही तरी करतोय हे दाखविण्याची त्यांची धडपड असल्याची टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

निशाणे फाट्याजवळ अपघातात एक ठार; पाच जखमी

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील निशाणे फाट्याजवळ दोन मोटारसायकलींना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एक जण ठार झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.

बीएचआर घोटाळ्यात मोठ्या नेत्यावर गुन्हा दाखल होणार- खडसे

मुक्ताईनगर प्रतिनिधी । बीएचआर सहकारी बँक घोटाळ्यात एका बड्या नेत्यावर गुन्हा दाखल होणार असल्याचे सूतोवाच माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी सूतोवाच केले आहे.

विवेक ठाकरेसह आता अन्य दलाल देखील रडारवर

जळगाव प्रतिनिधी । ठेविदारांच्या पावत्या जमा करून त्यांना अल्प रक्कम देत कोट्यवधींची माया जमा करण्याच्या गोरखधंद्यात विवेक ठाकरेसह आता अन्य दलालांची माहिती देखील समोर आली असून त्यांना अटक होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बीएचआर प्रकरणी जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांचीही चौकशी

जामनेर प्रतिनिधी । बीएचआर पतसंस्थेच्या घोटाळ्यात जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांची चौकशी देखील करण्यात आली असून याबाबत अद्याप सविस्तर तपशील समोर आलेला नाही.

कंत्राटी कर्मचार्‍यांना पुनर्नियुक्ती द्यावी; भाजप वैद्यकीय आघाडीला साकडे

भुसावळ प्रतिनिधी । कोरोनाच्या आपत्ती काळात कंत्राटी पध्दतीत कार्यरत असणार्‍या कर्मचार्‍यांना पुनर्नियुक्ती द्यावी अशी मागणी या कर्मचार्‍यांनी केली असून त्यांनी या संदर्भात भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि. तु.…

संगमनेरच्या उपनगराध्यक्षपदी कुंदन लहामगे यांची निवड

संगमनेर । येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी काँग्रेसचे नगरसेवक तथा महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक कुंदन लहामगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

धडपडणार्‍या शुभम सोनारला मदतीचे हात; चिकी विक्रीला प्रतिसाद !

जळगाव प्रतिनिधी । चिकी विकून शिक्षण करणार्‍या शुभम सोनार याबाबतची माहिती डॉ. नि. तु. पाटील यांनी सोशल मीडियात टाकल्यानंतर त्याला समाजातून मोठ्या प्रमाणात मदतीचे हात समोर आले आहेत.

हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता : ३ डिसेंबरच्या बैठकीकडे लक्ष

मुंबई । राज्य विधिमंडळाचे मुंबईत होणारे हिवाळी अधिवेशन हे पुढे ढकलले जाण्याची शक्यता असून या संदर्भात ३ डिसेंबर रोजी होणार्‍या बैठकीत निर्णय होण्याचे संकेत मिळाले आहेत.

डोक्यात अवजड वस्तू मारून तलाठी पत्नीचा खून; पोलीस पती गजाआड

पाचोरा नंदू शेलकर । चारित्र्यावर संशय घेत तलाठी पत्नीचा अवजड वस्तु डोक्यात मारुन पतीनेच हत्या केल्याची घटना शहरात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

आज जिल्ह्यात बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त !

जळगाव प्रतिनिधी । गत काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या वाढलेली असतांना आज मात्र गत २४ तासांमध्ये बाधीत रूग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे.
error: Content is protected !!