जळगावात नाल्याच्या पुरात वाहून गेला बालक !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शनिवारी आलेल्या जोरदार पावसामुळे नाल्याच्या पुरात बालक वाहून गेला असून रात्री उशीरापर्यंत त्याचा शोध सुरू होता.

या संदर्भातील माहिती अशी की, जळगाव शहरात काल दुपारून जोरदार पाऊस झाला. यामुळे हरीविठ्ठल परिसरातून जाणार्‍या नाल्याला पुर आला होता. याप्रसंगी सचिन राहूल पवार हा सहा वर्षाचा बालक खेळत असतांना पाण्यात पडलेला चेंडू घेण्यासाठी गेला असता पाय घसरून तो पाण्याच्या प्रवाहात पडून वाहून गेला.

दरम्यान, रात्री उशीरापर्यंत सचिन राहूल पवार याचा नाल्याच्या खालील बाजूस शोध घेण्याचे काम सुरू होते. मात्र तो मिळून आला नाही. सध्या पावसाळा सुरू असून नदी-नाल्यांना पूर आलेला आहे. यामुळे जलसाठ्यांजवळ जातांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Protected Content