ए .टी.झांबरे विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात साजरा

जळगाव, प्रतिनिधी  । ए .टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.

 

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मुख्याध्यापक डी.व्ही चौधरी यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे व क्रीडा साहित्याचे  पूजन करण्यात आले आणि पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी शिक्षकांच्या क्रिकेट आणि बुद्धीबळ  स्पर्धा घेण्यात आल्या. क्रिकेट स्पर्धेत एस.एच बाविस्कर यांचा संघ विजयी झाला.पराग राणे आणि आर.एन.तडवी यांना उत्कृष्ट गोलंदाज म्हणून तर इ.पी.पाचपांडे आणि ए.एन.पाटील यांना उत्कृष्ट फलंदाज म्हणून गौरविण्यात आले.  बुद्धिबळ स्पर्धेत व्ही.एस.गडदे आणि एन.बी पालवे यांनी विजय मिळवला. स्पर्धेसाठी सतिश भोळे, डी. ए. पाटील ,ए. एन. पाटील यांनी सहकार्य केले.

Protected Content