लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या स्मृती दिनानिमित्त आज कृतज्ञता सोहळा

सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | माजी मंत्री लोकसेवक कै. मधुकरराव चौधरी यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून आज खिरोद्यात भव्य कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, माजी मंत्री तथा विकासाचे महामेरू बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांचा उद्या स्मृती दिन असून याचे औचित्य साधून आज खिरोद्यात कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात कोरोना काळात महाराष्ट्रातील जनतेची सेवा करून लक्षावधीचे प्राण वाचवणारे तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे बाळासाहेब थोरात, अनिल देशमुख, राजेश टोपे आणि सतेज पाटील या मान्यवर नेत्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

याच कार्यक्रमात केळीचा समावेश पीक विम्यात करून केळी उत्पादकांना मोठा दिलासा दिल्याबद्दल पृथ्वीराज चव्हाण यांचा देखील या कार्यक्रमात सत्कार करण्यात येणार आहे. खिरोदा येथील धनाजी नाना विद्यालयाच्या प्रांगणात रविवार दिनांक ७ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता हा भव्य सोहळा होणार असून आमदार शिरीषदादा चौधरी व युवा नेते धनंजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली याचे नियोजन करण्यात आले आहे.

Protected Content