सरदार पटेल लेवा शिक्षक महासंघातर्फे पल्स ऑक्सीमिटरची भेट

फैजपूर प्रतिनिधी । जळगाव जिल्हा सरदार पटेल महासंघाद्वारा आज पल्स ऑक्सीमिटर न्हावी  ग्रामीण रुग्णालयास भेट देण्यात आले. 

शिक्षक हे कोरोना काळात खुप प्रेरणादायी कार्य करीत आहे.  कोरोना योद्धा म्हणून शासन जी जबाबदारी  देईल,ती शिक्षकवर्ग प्रामाणिकपणे पाडत आहे. या भीषण संकटात मदत कार्यामध्ये शिक्षकवर्गाचा मोठा वाटा आहे. सरदार पटेल लेवा शिक्षक महासंघ जि. जळगाव या शिक्षक समूहाने सामाजिक संवेदना जागृत ठेवून ग्रामीण रुग्णालय ,न्हावीला तीस हजार रुपये किमतीचे प्लस ऑक्सिमिटर/पँरामॉनिटर सप्रेम भेट दिले. ग्रामीण रुग्णालयला पँरामॉनिटरची आवश्यकता होती. त्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाने दिली होती. रुग्णांचे ईसीजी, एच.आर,एस.पी.ओ2 ,ST विश्लेषण,एन. आय .बी. पी.,तापमान अशा विविध बाबींचे मापन ही मशीन करते. रूग्णांचे प्राथमिक निदान करण्यासाठी ही मशीन अतिशय उपयोगी पडेल. रुग्णालयाला कोणतेही मदत लागल्यास शक्य ती मदत करण्याचे आश्वासन महासंघाने दिले. या प्रसंगी सरदार पटेल लेवा शिक्षक महासंघ अध्यक्ष प्रसन्ना बोरोले, सचिव विक्रांत चौधरी व महासंघाचे सदस्य सुरेश इंगळे, विजय कोल्हे, हरीश बोंडे, जितेंद्र फिरके, कुंदन वायकोळे, योगेश इंगळे, ललीत महाजन ,जीवन महाजन अमित चौधरी, डॉ कौस्तुभ तळेले, डॉ अभिजीत सरोदे,डॉ प्रसाद पाटिल ,रीता धांडे,मोहिनी भारंबे,संतोष चौधरी,संदीप महाजन ,न्हावी स्टाफ व  इतर  ग्रामस्थ उपस्थित होते. यासाठी  तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हेमंत बऱ्हाटे यांचे सहकार्य लाभले.

Protected Content