एक लाखासाठी विवाहितेचा छळ; पतीसह तीन जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील यशवंत नगरातील माहेर असलेल्या विवाहितेचा शेती करण्यासाठी माहेरहून १ लाख रूपये आणावे नाहीतर  घटस्फोट द्यावा या कारणावरून मारहाण व शिवीगाळ करणाऱ्या पतीसह सासू सासऱ्यांवर रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, वैशाली हेमंत पाटील रा. शेळावे ता. पारोळा ह.मु. यशवंत नगर, रामानंद नगर परीसर यांचा विवाह सन २००३ मध्ये हेमंत मधुकर पाटील यांच्याशी झाला. लग्नाचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पती हेमंत पाटील यांनी विवाहितेला शेती करण्यासाठी माहेरहून एक लाख रूपये आणावे यासाठी शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. परंतु आईवडीलांची परिस्थीत हालाखीची असल्याने विवाहिने पैसे आणले नाही म्हणून पतीसह सासरे मधुकर लक्ष्मण पाटील आणि सासु लिलाबाई मधुकर पाटील यांनी पतीला घटस्फोट दे किंवा माहेरहून एक लाख रूपये आणावे यासाठी शिवीगाळ व गांजपाठ केला. हा प्रकार विवाहितेला असहाय्य झाल्याने विवाहिता जळगाव येथे माहेरी निघून आल्या. विवाहितेच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीसात पतीसह सासू व सासऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनील पाटील करीत आहे. 

Protected Content