पाथरी येथे विष घेवून प्रौढाची आत्महत्या

Crime

जळगाव प्रतिनिधी । विषारी औषध प्राशन करून पाथरी येथील प्रौढाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. वसंत फकीरा जाधव (वय-५५) असे मयताचे नाव असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, वसंत जाधव हे पाथरी येथे पत्नीसोबत वास्तव्यास होते तर घराजवळ दोन्ही मुले राहतात. पत्नी बाहेरगावी गेल्या असल्यामुळे वसंत हे घरी एकटे होते. त्यामुळे शनिवारी रात्री घरात कुणी नसताना त्यांनी विषारी औषध प्राशन केले. त्यावेळी त्यांना उलट्या झाल्या़ दरम्यान, शेजारीच राहत असलेली सूनेला विषारी औषधाचा वास आला. तिने पतीसोबत सासऱ्‍यांच्या घरात गेली असता त्यांना वसंत हे अत्यावस्थ अवस्थेत आढळून आले. त्यांनी त्वरित जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, उपचार घेत असताना वसंत यांचा मध्यरात्री मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंड असा परिवार असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास अतुल पाटील, सुदर्शन ढवळे हे करीत आहेत.

Protected Content