सत्ता येणार हा भाजपचा स्वप्नदोष : संजय राऊत

sanjay raut devendra fadnavis

मुंबई (वृत्तसंस्था) रात्री झोपले की, त्यांच्या स्वप्नात सत्ता येते आणि जाग आली की निघून जाते. भाजपची सत्ता येणार हा त्यांचा स्वप्नदोष आहे. तसेच हा विरोधी पक्षाला लागलेला धक्का आहे. या धक्क्यातून सावरण्यासाठी त्यांना काउंसलिंगची आवश्यकता आहे. वेळ आली तर मी स्वतः त्यांचे काउंसलिंग करेन, अशी बोचरी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.

 

एका वृत्तवाहिनीशी चर्चा करताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांवर खरपूस टीका करतानाच ऑपरेशन लोटसची खिल्लीही उडवली. ऑपरेशन लोटसबिटस काही नसतं. आमचे हातही अनेक ऑपरेशन करून तयार झाले आहेत. आमचेही ऑपरेशन थिएटर आहे. आम्ही नाजूक हाताने सर्वात जास्त चिरफाड करू शकतो. १०५ आमदार असूनही सत्ता आली नाही, याचा धक्का विरोधकांना बसला आहे. हा भूकंपाचा धक्का आहे. त्यामुळे त्यांना दिवसाढवळ्याही सत्तेची स्वप्न पडत असतात. आता खातेवाटप किंवा मंत्रिमंडळ विस्तार हे सर्व झाल्यामुळे महाराष्ट्र राज्याला शांत झोप लागेल. मंत्रिमंडळ कामाला लागेल लोकांचे प्रश्न सुटतील. आमचे काम झाले आम्ही मोकळे झालो. टीका ही होतचं असते, महाविकासआघाडी आहे. तीन पक्ष आहेत, तिन्ही पक्षांचे तीन नेते आहेत. यातील एका पक्षाच हायकमांड दिल्लीत असल्यामुळे त्या पक्षाच्या नेत्यांना सातत्याने दिल्लीत जावे लागते. याद्या घेऊन, मंजुरीसाठी अन्य काही छोटेमोठे प्रश्न घेऊन. बाकी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईतच आहेत. तरीही तिन्ही पक्षांमधील लोकं काही अपक्ष प्रत्येकाचे हट्ट,छंद, आवडीनिवडी हे सर्व सांभाळताना फार मोठी कसरत करावी लागते, ती कसरत पूर्ण झाली आहे. आता सर्कस कामाला लागली आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

Protected Content