एरंडोलच्या युवासेना पदाधिकाऱ्यांनी घेतली आदित्य ठाकरे यांची भेट

एरंडोल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी येथील युवासेनाच्या पदाधिकाऱ्यांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन एरंडोल विधानसभा मतदार संघातील स्थिती विषयी चर्चा केली.

येथील युवासेना उपजिल्हाप्रमुख विवेक पाटील, शहरप्रमुख अतुल महाजन, शहर समन्वयक अमोल भावसार, देवेन पाटील, प्रसाद महाजन, नितीन बोरसे, राजेश महाजन, आकाश निंबाळकर या युवासेनाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी, २६ जुलै रोजी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. एरंडोल विधानसभा मतदार संघातील स्थितीविषयी त्यांच्याशी चर्चा केली.

एरंडोल तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून तो ढासळू देऊ नका. असे सूचना वजा आव्हान आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले. एरंडोल तालुक्यातील शिवसैनिक हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी बांधील असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याची ग्वाही उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.