दशामाता मिरवणुकीने वेधले शहरवासियांचे लक्ष

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी फैजपूर येथे मीनापाडा निवासिनी दशामाता उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले असून बुधवारी दशमाता स्थापनेनिमित्त शहरातून मिरवणुक काढण्यात आली या मिरवणुकीने शहरवासीयांचे यांचे लक्ष वेधून घेतले होते.

यावल रोडवरील जानकी नगरमध्ये पिंपरुड येथील ग्राम पंचायत सदस्या किरण कोल्हे यांच्याकडे उद्या गुरुवार, दि.२८ जुलै रोजी रोजी दशामातेची विधिवत स्थापना करण्यात येणार आहे. आज बुधवार, दि. २७ जुलै रोजी दुपारी फैजपूर शहरातील श्रीराम मंदिरापासून दशामाता मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत विधिवत स्थापना होणाऱ्या मूर्ती सोबतच दशामाताचा सजीव देखावाही साकारण्यात आला होता. यासह कारगिल दिवसा निमित्तही शूरवीर जवानांचा देखावाही आकर्षण ठरत होता. ही मिरवणूक श्रीराम मंदिर, खुशालभाऊ रोड, सुभाष चौक, बऱ्हाणपूर अंकलेश्वर मार्गे जाऊन यावल रोडवरील जानकी नगरात समाप्त झाली.

दरम्यान, गुरुवारी दशामाता मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात येणार असून भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन किरण प्रवीण कोल्हे यांनी केले आहे.

Protected Content