अखेर भादली रेल्वे स्टेशनजवळून भुयारी मार्गाच्या कामास होणार सुरुवात

नशिराबाद , प्रतिनिधी | भादली रेल्वे स्टेशन जवळील गेट नंबर १५३ गेल्या तीन वर्षापासून भुयारी मार्गाच्या कामासाठी बंद आहे. यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज महाजन यांनी रेल्वे प्रशासनाकडे भुयारी मार्गासाठी वारंवार पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून रेल्वे प्रशासनाने भुयारी मार्गाचे काम  लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याचे पंकज महाजन यांना पत्राद्वारे कळविले आहे.

 

भादली रेल्वे स्टेशन जवळील गेट नंबर १५३ गेल्या तीन वर्षापासून भुयारी मार्गाचे कामासाठी बंद आहे. गेट बंद असल्याने रेल्वे लाईनच्या फार शेती असलेल्या असंख्य शेतकऱ्यांना फार मोठ्या संकटांना संकटांचा सामना करावा लागत आहे लक्षात घेता राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नशिराबाद तर्फे रेल्वे विभाग भुसावळ येथील महा रेल प्रबंधक यांच्या कार्यालयात भुयारी मार्गाचे काम करण्याकरिता करण्यासाठी पाठपुरावा सातत्याने सुरू होता. अखेर रेल्वे विभाग भुसावळ उपमुख्य कार्यकारी अधिकारी बांधकाम यांनी पंकज महाजन यांना लेखी पत्र देऊन २५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत काम सुरू होऊन होऊन मार्च २०२२ पर्यंत सदरचे काम पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. मध्य रेल्वे बांधकाम विभागातर्फे मिळालेल्या लेखी आश्वासनानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील वर्षीच्या हंगामात आपला जवळचा रस्ता रहदारी उपलब्ध होणार असल्याने शेतकरी आशावादी झालेला आहे. सदर पत्र मिळाल्याचे आतापर्यंत केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. भादली रेल्वे गेट बंद असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यास भादली सब स्टेशनकडील गेट नंबर १५२ च्या रस्त्याने शेतात जावे लागत आहे. त्यासाठी त्यांना अधिकचे दोन ते तीन तास लागत आहेत. त्याचा परिणाम शेतात काम करण्यावर होत असून उत्पादनात घट होत आहे. बैलांना सुद्धा अधिक श्रम करावे लागत आहे.

 

Protected Content