शिवसेनेतर्फे गोलाणीच्या सांडपाण्याच्या निषेधार्थ अनोखे आंदोलन (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी ।महापालिकेकडे वारंवार मागणी करून देखील गोलाणी मार्केटच्या तळमजल्यावर साचणाऱ्या सांडपाण्याची समस्या दूर न झाल्याने त्या साचलेल्या सांडपाण्यात ढोलच्या निनादात कागदी नाव व मासे सोडून शिवसेना महानगर व गाळेधारकांकडून आंदोलन करण्यात आले.

गोलाणी मार्केटच्या तळमजल्यावर सांडपाणी साचत आहे. या पाण्यातून दुर्गंधी येत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिका प्रशासन व सत्ताधारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी नगरसेवक विष्णू भंगाळे यांनी सांगितले की, मागील अनेक वर्षांपासून सांडपाणी साचण्याची समस्या असून उपमहापौर सुनील खडके हे पाहणी दौऱ्यावर असतांना त्यांना याबाबत मंगला बारी यांनी अवगत करून दिले होते. गोलाणी मार्केटच्या पाईप लाईनमध्ये वारंवार घाण पाणी अडकत असते, ती फार जुनी झाली असून ती काढून तेथे नवीन पाईपलाईन बसविण्यात यावी अशी मागणी श्री. भंगाळे यांनी केली. याप्रसंगी शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, मंगला बारी, पूनम राजपूत, प्रशांत सुरळकर आदी उपस्थित होते.

सांडपाण्यात सोडल्या आमदारांसह पदाधिकारी यांच्या नावाची कागदी बोट

सांडपाण्यात आमदार, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, आयुक्त, उपायुक्त यांचे नाव असलेल्या कागदी बोटी सोडण्यात आल्या. यासोबत मासे सोडून दिवे पेटवून व फुले वाहण्यात आले.

व्हिडीओ लिंक
भाग-१ https://www.facebook.com/508992935887325/videos/237223644416322/

भाग-२ https://www.facebook.com/508992935887325/videos/4138640686165210/

Protected Content