फिनीक्स युथ फाऊंडेशनतर्फे पूरग्रस्तांना मदत

finix youth foundation help

जळगाव प्रतिनिधी । येथील फिनिक्स युथ फाऊंडेशनतर्फे कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांमधील पूरग्रस्तांसाठी मदत पाठविण्यात आली आहे.

फिनिक्स युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष विशाल वाणी व फाऊंडेशन चे सर्व पदाधिकारी यांनी कोल्हापुर, सातारा व सांगली येथील पूरग्रस्त लोकांना मदतीसाठी आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत जळगाव शहरातील लोकांनी मोठ्या प्रमाणात वस्तू संकलन करून पोहोचवले. तसेच या सर्व वस्तूंची विभागणी करून ते फाऊंडेशन च्या पदाधिकारींनी ३०० बॅग बनवून प्रत्येक एका बॅगेत (धान्य,गॅस शेगडी,साखर,कपडे,साबण, पाण्याच्या बॉटल,सॅनिटरी नॅपकीन, उपयोगी औषधे व खाद्य पदार्थ) पॅक करून हे सर्व साहित्य नुकतेच कोल्हापुर, सातारा व सांगली येथे वाहनाद्वारे रवाना करण्यात आले.

या वेळी फ़ाउंडेशनचे पदाधिकारी हर्षल इंगळे,संकेत कापसे,पियुष वानखेडे,चिरायु जोशी,शुभम चौधरी,राकेश कोळी,प्रणाल पाटील,शुभम पाटील,तेजस भावसार,गौरव देशमुख,भारत पाटील,ज्ञानेश्‍वर पाटील,निलेश सपकाळे आदी उपस्थित होते

Protected Content