नेट जेआरएफ परीक्षेत सौरभ पाटील देशातून सहावा

saurabh patil faizpur

फैजपुर प्रतिनिधी । दिल्ली येथील सीएसआयआरतर्फे घेण्यात आलेल्या नेट जेआरएफ परीक्षेत सौरभ उमाकांत पाटील या विद्यार्थ्याने नेत्रदीपक यश संपादन करत भारतातून सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान पटकावला आहे.

फैजपूर येथील शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालयातील प्रा.उमाकांत पाटील (पत्रकार) व कुसुमताई मधुकरराव चौधरी प्राथमिक विद्यालयातील उपशिक्षिका सुनिता इंगळे-पाटील यांचा सुपुत्र सौरभ पाटील याने दिल्ली येथील सीएसआयआर द्वारा आयोजित नेट जेआरएफ परीक्षेत Earth, Atmospheric, Ocean and Planetary Science या विषयात घवघवीत यश मिळवीत देशातून सहावा क्रमांक पटकाविला आहे.

सौरभ पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील डिपार्टमेंट ऑफ ॲटमॉसफेरीक अँड स्पेस सायन्स या विषयातून एमएस्सी च्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याच्या यशाबद्दल परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, शास्त्री भक्ती किशोरदासजी, प.पू. श्याम चैतन्यजी महाराज, शास्त्री भक्तीस्वरूप दासजी ना. हरिभाऊ जावळे, ॲड. अजय तल्हार, प्राचार्य पिंगला धांडे आदींसह समाजातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षा होत आहे.

Protected Content