मनवेल येथील आश्रम शाळेतील मुख्यध्यापकांना पडला महर्षी वाल्मीक जयंतीचा विसर

 

यावल प्रतिनीधी । तालुक्यातील मनवेल येथे आद्यकवी महर्षी वाल्मीक जयंती साजरी करण्याबाबत शासन परीपत्रकाला तिलांजली देत मनवेल आश्रम शाळेतील मुख्यध्यापकला महर्षी वाल्मीक जयंती साजरी करण्याचा चक्क विसर पडल्याने मनवेल येथील ग्रामस्थांनी प्रकल्प आधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.

३१ ऑक्टोबर रोजी महर्षी वाल्मीक जयंती ,सरदार वल्लभभाई जयंती व इदिरा गांधी पुण्यतीथी यावल तालुक्यात विविध शासकीय कार्यलयात व सामाजिक संघटना मार्फत साजरी करण्यात आली असता, शासन परीपत्रक क्रमांक २२१९/प्र.क.७१/१९दि.१२ डीसेबर २०१९नुसार सन २०२० मध्ये राष्ट्र पुरुष /थोर व्यक्ती यांची जयंती /राष्ट्रीय दिन साजरा करण्यात यावा अशा निर्णय घेण्यात आला असता त्यानुसार त्यातील जा. क्र.३० वर महर्षी वाल्मीक जयंती (तीथीनुसार भारतीय महिना व दिवस९ कार्तिक शके ३१ आँक्टोबंर २०२० शनिवारी साजरी करण्यात येऊन प्रतिमा पुजन करणे अशा आवश्यक त्या सुचना देण्यात आलेल्या असतांना मनवेल आश्रम शाळेतील मुख्यध्यापकांना महर्षी वाल्मीक जयंतीचा विषर पडला आहे. अशा प्रकारे शासनाच्या नियमांना न जुमानणाऱ्या मुख्यध्यापकावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी तक्रार मनवेल येथील ग्रामस्थांनी यावल आदीवासी एकात्मिक विकास प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे यांचाकडे केली आहे.

Protected Content