बामणोदच्या सहकारी सोसायटीची सर्वसाधारण सभा संपन्न

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील बामणोद तालुका यावल विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली.

दिनांक १८ सप्टेंबर २०२२ रविवारी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी बामणोद तालुका यावल ची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन सौ सुवर्णलता नरेंद्र कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी नऊ वाजता सुरू होऊन सभेच्या विषय पत्रिका नुसार सर्व विषयांवर सर्व सन्मानिय संचालक मंडळाची चर्चा होऊन सभे पुढे आलेल्या सर्व विषयांना सर्वानुमते मंजूर करण्यात आली.

संस्थेचे सभासद योगेश मोहन इंगळे यांची ग.स सोसायटी जळगाव यामध्ये निवडणुकीमध्ये विक्रमी मतांनी निवड झाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन सुवर्णलता कोल्हे यांनी त्यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत सत्कार केला व बामनोद येथील रहिवासी व यावल तालुक्यातील डांभुर्णी शाळेतील शिक्षक विनोद मनोहर सोनवणे यांना जिल्हा परिषद जळगाव यांच्यातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा देखील सत्कार संस्थेचे व्हाईस चेअरमन प्रल्हाद धन:श्याम केदारे यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

संस्थेला २o२१ ते २०२२ या आर्थिक वर्षामध्ये १२ लाख ८७ हजार नफा झालेला असून नफा वाटणी केलेली आहे त्यानुसार संस्थेच्या सभासदांना १२ टक्के एवढा डिव्हीडंट मंजूर करण्यात आला. सभेमध्ये गावातील सभासदांनी सहभाग घेऊन खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सभा संपन्न झाली. त्यावेळेस संस्थेचे सचिव सतीश भंगाळे यांनी विषय वाचन केले तर संस्थेचे संचालक चंद्रकांत तळले यांनी आभार व्यक्त केले.

व्यासपीठावर संस्थेचे संचालक डॉ. नरेंद्र कोल्हे, दिनकर भंगाळे प्रशांत सरोदे अनंत फेगडे, दीपक नेहते, प्रमोद बोरोले, पुरुषोत्तम भोळे, अक्षय तायडे, गोरख जयसिंग चौधरी, शशिकांत प्रल्हाद चौधरी व माजी जि प सदस्य डॉ जे डी भंगाळे यांची उपस्थिती होती व संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी  कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Protected Content