जळगावातून निघाली भव्य जेसीएल रॅली

जळगाव प्रतिनिधी । आगामी जेसीएल स्पर्धेच्या पार्श्‍वभूमिवर आज जळगाव शहरातून भव्य रॅली काढण्यात आली.

जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे १२ ते १७ मार्च दरम्यान खान्देशातील सर्वात मोठ्या आयपीएलच्या धर्तीवर टि-२० जळगाव क्रिकेट लिगच्या आधी शहरातून भव्य अशी कार व मोटारसायकल रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीस सुरवात झाली. यावेळी अभय जैन, रजनिकांत कोठारी, महेंद्र रायसोनी, जैन स्पोर्टस अकॅडमीचे एस टी खैरनार, अविनाश जैन, अविनाश राठी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने या रॅलित सहभागी झाले होते. डीजे, ढोल-ताशा आणि स्पोर्टस् कार, रोडवर चालणारी रेल्वे, बाईक्स् मोठ्या संख्येने सहभाग होता.

टी-२० जेसीएलमध्ये सहभागी स्पेक्ट्रम चॅलेन्जर्स, वनिरा इगल्स, रायसोनी अचिव्हर्स, एम के वॉरियर्स, के के कॅन्स थंडर्स, खान्देश ब्लास्टर्स, कोझी कॉटेज स्ट्रायकर्स आठ संघांचे मालक दीपक चौधरी, सौ. किरण महाजन, प्रीतम रायसोनी, महेंद्र कोठारी, आदर्श कोठारी, धीरज अग्रवाल, आणि आयकॉन खेळाडू तसेच संघात सहभागी खेळाडूंनी या रॅलीमध्ये भाग घेतला होता. ही रॅली खान्देश सेंट्रल येथून निघून नेहरू चौक, शास्त्री टॉवर, चित्रा चौक, जी.एस. ग्राऊंड, स्वातंत्र्य चौक, आकाशवाणी चौक आणि काव्यरत्नावली चौक, महाबळ अशी निघाली होती. रॅलीचा समारोप शिव छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे समारेप झाला. समारोपाच्यावेळी जैन स्पोर्टस् अकॅडमीचे अध्यक्ष अतुल जैन, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

जेसीएल स्पर्धेत १२ ते १७ मार्च दरम्यान दररोज तीन सामने खेळले जातील. त्यासाठी व्हीआयपी दालन, कुटुंबांसाठी तसेच सामान्य प्रेक्षक अशा तीन दालनांची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. या दालनांमध्ये अमर्याद अशी हाय स्पीड इंटरनेट फ्री वायफाय सुविधा पुरविली जाणार आहे. ही वायफायची सुविधा सगळ्यांसाठी मोफत राहणार आहे.त्याच प्रमाणे स्पर्धांसाठी लोक सहभाग जास्तीत जास्त व्हावा याकरीता विविध क्विझ् स्पर्धा ही घेतल्या जातील. उदाहरणार्थ स्पॉट द एरर किंवा मगुड सेल्फीफ अशा स्पर्धांचा समावेश असेल. सामन्याच्या ब्रेकच्यावेळी विजेत्यांचे नावे जाहीर करून त्यांना फ्री कुपन्स, बक्षिसे देखील देण्यात येणार आहेत.

Add Comment

Protected Content