चंद्रकांत भंडारी यांच्या पुस्तकाचे उद्या प्रकाशन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | केसीईचे शिक्षण समन्वयक तथा ख्यातनाम लेखक, स्तंभलेखक व शिक्षणतज्ज्ञ चंद्रकांत भंडारी Chandrakant Bhandari Jalgaon यांच्या ‘शोध : शिक्षणासह माणसांचा’ या पुस्तकाचे उद्या ए. टी. झांबरे विद्यालयात प्रकाशन होत आहे.

Inage Credit Source: Live Trends News

चंद्रकांत भंडारी हे गेल्या नऊ वर्षांपासून गल्ली तुमची पालकसभा आमची तसेच कुटुंब तुमचे प्रबोधन आमचे हे दोन उपयुक्त प्रयोग राबवत आहेत. याचा आजवर हजारो पालक आणि शिक्षकांना लाभ झालेला आहे. एखादा शैक्षणिक उपक्रम मानसेवी तत्वावर इतक्या प्रदीर्घ काळापर्यंत चालविण्याचे हे उदाहरण दुर्मीळ म्हणून गणले जाणार आहे.

या कालावधीत चंद्रकांत भंडारी आणि त्यांच्या पत्नी सौ. सुनीता यांना जे काही अनुभव आलेत, ते पुस्तकाच्या रूपाने ‘शोध : शिक्षणासह माणसांचा’ यातून जगासमोर येत आहे. उद्या म्हणजेच शनिवार दिनांक १५ जुलै रोजी दुपारी तीन वाजता एका छोटेखानी कार्यक्रमात या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. जळगावच्या अथर्व प्रकाशन या ख्यातनाम संस्थेतर्फे याचे प्रकाशन होत असून चंद्रकांत भंडारी यांचे हे सतरावे पुस्तक आहे.

Protected Content