साकळीच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात १० व १२ वी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील साकळी येथील सर सैय्यद एज्युकेशन सोसायटी संचलित अंजुमन ए ईस्लाम उर्दु हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यायात इ. १० व १२ च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला .

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सरचिटणीस वरीष्ठ पत्रकार के बी खान होते. दोन वर्षापासून ‘कोव्हीड १९’ मुळे निरोप समारंभ होवू शकला नसल्याने या वेळेस मात्र उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात उपशिक्षक मो.युनूस शेख यांनी पवित्र कुरआन पठण करुन केली . कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे संचालक हाजी शे.हुसेन यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य हाजी मो.हनीफ खान यांनी केले.

आपल्या प्रस्ताविकेत त्यांनी शाळेने गेल्या ३० वर्षापासून केलेल्या विकासाविषयी सविस्तर माहिती दिली.कार्यक्रमात पुमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष सैय्यद अहमद, स्कुल चेअरमन निसार खान, संचालक शे.बिस्मिल्ला शे.इसा, शे.रफिक शे.मुनाफ, शे.इकबाल शे लतीफ, शे.बिस्मिल्ला अ.रहेमान, यासीन खान, गुलाम दस्तगीर खान हे होते. प्रसंगी प्राचार्य व सर्व शिक्षकांनी प्रमुख अतिथींचा सत्कार केला.

प्राचार्य मो.हनीफ खान यांचा ‘मे’ अखेर निवृत्त होत असल्याने यांचा हा शेवटचा कार्यक्रम. उपस्थित अतिथींच्या हस्ते त्यांचाही सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वागत गीत, ईश्वर भक्तीपर हम्द ( कवीता ) नआत संस्थेचे गीत आपल्या मधुर आवाजात म्हटले.

या शिवाय विद्यार्थी व काही विद्यार्थिनीनी आपले मनोगत व्यक्त करुन शिक्षकांप्रती आपले प्रेम व कृतज्ञता व्यक्त केली. ५ वी ते १२ वीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह अतिथींच्या हस्ते देवून गौरविण्यात आले. अध्यक्षीय मनोगतात के.बी.खान यांनी विद्यार्थ्यांना यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या . सूत्रसंचालन कवी, उपशिक्षक अशफाक निजामी यांनी केले. तर आभार शिक्षक साजीद मिर्झा यांनी मानले.

Protected Content