गोवंश हत्येसह गोतस्करी थांबवा- विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन (व्हीडीओ)

जळगाव, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यात गोवंश हत्या तसेच गार्यींची तस्करी करण्याविरुद्ध कायदा आहे. परंतू जिल्ह्यात स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांचाच यास आशीर्वाद असल्याचे चित्र दिसत असल्याचे सांगत गोवंश हत्येसह गोतस्करी थांबविण्यात यावी यामागणीसाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले.

राज्यात गोवंश हत्या तसेच गार्यींची तस्करी करण्याविरुद्ध कायदा आहे. गोवंश हत्येसह गोतस्करी बेकायदेशीर कृत्य करणाऱ्याविरुद्ध शिक्षादेखील आहे. परंतू जिल्ह्यात या कायद्याचा कोणताही वचक नसल्याचे दिसून येत आहे. पोलीस प्रशासन केवळ मूकदर्शक असून यास स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांचाच यास आशीर्वाद असल्याचे चित्र असून गोवंश हत्येसह गोतस्करी थांबविण्यात यावी यामागणीसाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग कार्यवाह अविनाश नेहते, खा.उन्मेष पाटील, भाजपा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिल्हामंत्री देवेंद्र भावसार, श्रीराम बारी, राकेश लोहार, डॉ.राहुल चौधरी, भूषण क्षत्रिय, आकाश फडे, हरीश कोल्हे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

व्हिडीओ लिंक
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1126207948203226

Protected Content