गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयाची पारले बिस्कीट कंपनीला औद्योगिक भेट

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशन संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च महाविद्यालयाची जळगाव एमआयडीसी मधील पारले कंपनीला औद्योगिक भेट देण्यात आली.

पदवी अभ्यासक्रमांमध्ये औद्योगिक भेटी हा शैक्षणिक अभ्यासक्रमाचा एक आवश्यक भाग आहे. अशाप्रकारच्या  शैक्षणिक भेटी विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्राशी संबंधित व्यावहारिक दृष्टीकोनासह वास्तविक कामकाजासंबधी माहिती देतात म्हणून या औद्योगिक भेटीचे आयोजन केले होते.

या भेटीमध्ये कंपनीमध्ये पारले जी ग्लुकोसचे बिस्कीट बनविण्याची पध्दत दाखविली गेली. यामध्ये बिस्किटाचे मिश्रण तयार करून बिस्किटांचा आकार देणे त्यानंतर ओव्हन मध्ये बिस्कीट गेल्यानंतर विशिष्ट तापमानावर तयार करणे व ओव्हन मधून बाहेर आल्यावर बिस्कीट थंड करून त्याची गुणवत्ता तपासणे आणि लहान व मोठ्या पाकिटमध्ये पॅक करणे अशी सर्व पध्दत विद्यार्थ्यांना दाखविली गेली. सदर भेटीमध्ये महाविद्यालयामधील एम.बी.ए, बी.बी.ए व बी.सी.एचे विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी यावेळी आपले प्रश्न विचारून माहिती मिळविली.   या भेटीचे सर्व कामकाज महाविद्यालयाच्या प्रा. प्राजक्ता पाटील व प्रा. एम.के. गोडबोले यांनी बघितले.

Protected Content