Home Cities अमळनेर अमळनेरात गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम

अमळनेरात गजानन महाराज पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम

0
110


अमळनेर प्रतिनिधी । सोनानगर येथील गजानन महाराज मंदिरात गजानन महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होते.

यावेळी सकाळी सहा वाजता अभिषेक करण्यात आला. सकाळी आठ ते अकरा वाजता पादुका पूजन नितिन भावे यांनी केले. यानंतर गजानन महाराज महिला मंडलानी सामुहिक पारायण वाचन केले. सत्संग महिला मंडळ यांनी भजन गायिले.  यानंतर अनिल पाटील यांनी प्रसाद केला. यावेळी महाळपुर ता.पारोला येथील राजधर आबा यांनी दुपारी दोन वाजता गिताप्रवचन केले.महाळपुर येथील भजनी मंडळानी भजन संध्याचा कार्यक्रम झाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आर.बी. पवार, प्रवीण पवार, एस के बागुल, एल जी चौधरी ,ज्योती पवार, शोभा कोळी, वंदु भारती, पुंडलीक पाटील आदींनी परिश्रम घेतले.

 


Protected Content

Play sound