संचारबंदी : श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळातर्फे घरपोच विनामूल्य सेवा

जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या कालावाधीत नागरिकांनी घरा बाहेर पडू नये असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिक घरीच थांबत आहेत. संचारबंदी व सोशल डीस्टीसिंगमुळे शहरातील वरिष्ठ नागरिक व स्वतंत्र राहणाऱ्या वरिष्ठ गरजुंना श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळातर्फे औषध व किराणा माल घरपोच विनामूल्य सेवा दिली जात आहे.

श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक कैलास सोनवणे यांनी संचारबंदी व सोशल डीस्टीसिंगच्या काळात शहरातील वरिष्ठ नागरिक व स्वतंत्र राहणाऱ्या वरिष्ठ गरजुंना सामानाचे पैसे बिलानुसार घेऊन घरपोच मोफत सेवा सुरु केली आहे. यानुसार याची नोंदणी एका दिवसापूर्वी सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यत करता येणार असून घरपोच सेवा दुसऱ्या दिवशी सकाळी ७ ते सांयकाळी ५ वाजेदरम्यान करण्यात येणार आहे. तसेच जळगाव शहरात राहणाऱ्या लोकांना अत्यावश्य्क सेवांमध्ये काही अडचणी येत असतील तर त्यांनी ९८२२३ ४७६९७, ९६६५१ ९०४१२,  ८६०५९ २५०७०, ७७९८८, ०७७७८, ९०९६६ २०१७७ या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन नगरसेवक कैलास सोनवणे यांनी केले आहे. दरम्यान, आज श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळाचा कार्यकर्त्यांकडून शहरातील शिवधम मंदिर परिसरातील गोकुळ आत्माराम सपकाळे यांना घरपोच औषधी देण्यात आली.

Protected Content