नोकरीचे आमिष दाखवत बेरोजगार तरूणाची ऑनलाईन फसवणूक

जळगाव प्रतिनिधी | नोकरीच्या शोधात असलेल्या एका उच्च शिक्षित तरुणास मोबाइलवर फोन करून एटीएमची माहिती विचारुन बँकेच्या खात्यातील १७ हजार रुपये परस्पर काढून ऑनलाईन फसवणूक केली आहे. याप्रकरणी सायबर पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

जुन्या जळगावात राहणाऱ्या या तरुणाचे उच्च शिक्षण झाले आहे. सध्या तो नाकरीच्या शोधात असून काही वेबसाइटवर त्याने सर्चिंग केले. काही ठिकाणी बायोडाटा पाठवला आहे. यातूनच त्याचा मोबाइल नंबर संबंधितांपर्यंत पोहोचला आहे. यातून सोमवारी (१६ मार्च) सायंकाळी त्याला एका संबंधित कंपनीतून तरुणीचा फोन आला. नोकरीसाठी अर्ज केल्याच्या निमित्ताने फोन केल्याचे या तरुणीने सांगितले. बराच वेळ नोकरीसंदर्भात बोलणे झाल्यानंतर या तरुणीने तरुणास एटीएम कार्डबद्दल विचारणा केली. नोकरी मिळवण्यासाठी एक प्रक्रिया पूर्ण करायची आहे. त्यासाठी अत्यल्प प्रमाणात शुल्क आकारले जाईल, अशी कल्पना तरुणीने दिली. यानंतर थेट मोबाइलचा १३ अंकी नंबर, सीव्हीव्ही नंबर विचारुन घेतला. तसेच बोलण्यात गंुतवून तरुणाच्या मोबाइलवर आलेला ओटीपी (वन टाइम पासवर्ड) देखील विचारुन घेतला. यानंतर काही मिनीटातच या तरुणाच्या बँक अकाऊंटमधून १७ हजार रुपये काढले गेले, असा मॅसेज आला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या तरुणाने सुरुवातीला शनिपेठ व नंतर सायबर पोलिसांकडे तक्रार केली.

Protected Content