जळगावात मद्यपी तरूणांचा धिंगाणा

जळगाव प्रतिनिधी | शहरातील बळीराम पेठेतील एका गल्लीत तोंडाला रुमाल बांधून आलेल्या मद्यपी तरुणांनी कारवर काचेची बाटली व दगडफेक केल्याने रात्री ८.३० वाजेच्या सुमारास तणाव निर्माण झाला होता.

या प्रकरणी शहर पाेलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज घेऊन या हल्लेखाेर तरुणांचा शाेध घेत अाहेत.
रात्री ८.३० वाजेच्या सुमारास बळीराम पेठेत उभ्या असलेल्या कारवार (एमएच-२०, बीएन- ९१५२) शेजारच्या गल्लीतून दुचाकीवर अालेल्या तरुणांनी काचेची बाटली व दगड फेकून कारचे नुकसान केले. या तरुणांनी मद्यपान केले हाेते. तसेच ताेंड रुमालाने झाकलेले हाेते. या दगडफेकीने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते. तर कारचे सुमारे १५ ते २० हजार रुपयांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच शहर पाेलिस ठाण्याचे पथक लगेचच घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान सीसीटीव्हीच्या माध्यमातून या तरूणांचा शोध घेतला जात आहे.

Protected Content