काँग्रेस आमदार बंदिस्त असलेल्या हॉटेल बाहेर दिग्विजय सिंहांचे धरणे आंदोलन

 

बंगळूर (वृत्तसंस्था) बंगळूरमध्ये बंडखोर काँग्रेस आमदार बंदिस्त असलेल्या हॉटेलसमोर काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह आज धरणे आंदोलन केले. मात्र, थोड्याच वेळात त्यांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेण्यात आले.

 

मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकारला निर्माण झालेल्या धोक्यामुळे राजकीय संघर्ष टोकाला गेला आहे. राज्यातील विद्यमान काँग्रेस सरकारला १६ मार्चला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपाल लालजी टंडन यांनी दिले होते. तथापि, कोरोना विषाणूच्या बहाण्याने राज्यपाल लालजी टंडन यांनी निश्चित केलेल्या १६ तारखेकडे सरकारने दुर्लक्ष केले. आता ही बाब सर्वोच्च न्यायालयात पोहोचली असून, त्यावर आज सुनावणी साडेदहा वाजता होणार आहे. दरम्यान, यावेळी दिग्विजय सिंह म्हणाले की, २६ मार्च रोजी राज्यसभा निवडणूक मतदान होत असून ते आपल्या आमदारांशी बोलण्यासाठी आले आहेत.

Protected Content