अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील सावखेडा शिवारातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरवर पोलीसांनी कारवाई केली आहे. याबाबत विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरवरील अज्ञात चालक व मालक या दोघांवर गुरुवारी रात्री जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरापासून जवळ असलेल्या गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूची मोठी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती परिविक्षाधिन पोलीस उपअधिक्षक आप्पासो पवार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या गुरुवार २० जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता पथकाने सावखेडा शिवारात असलेल्या हनुमान मंदिराजवळ विना क्रमांकाचे वाळूने भरलेले ट्रॅक्टर पकडले. यावेळी ट्रॅक्टर चालक हा वाहन सोडून पसार झाला. पोलिसांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर तालुका पोलीस ठाण्यात जमा केले आहे. याप्रकरणी गुरुवारी २० जुलै रोजी रात्री १० वाजता पोलीस नाईक प्रकाश चिंचोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विना क्रमांकाच्या ट्रॅक्टर वरील अज्ञात चालक व मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विश्वनाथ गायकवाड करीत आहे.

Protected Content