जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धांचे आयोजन; स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  नवी दिल्लीच्या सुब्रतो मुखर्जी एज्युकेशन सोसायटी वतीने ६२ व्या आंतरराष्ट्रीय सुबतो मुखर्जी फुटबॉल कपच्या तयारीसाठी जिल्हास्तरावर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. या स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील संघानी सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

 

सुबतो मुखर्जी फुटबॉल राष्ट्रीय स्पर्धा १४ सप्टेंबर से २३ ऑक्टोबर या कालावधीत १७ वर्षाआतील मुले/मुली (ज्युनिअर) या वयोगटाच्या स्पर्धा दिल्ली येथे आयोजित होत आहेत. व १४ वर्षाआतिल मुले (सबज्युनिअर) या योगाच्या स्पर्धा बंगलूर येथे होत आहेत.  सदर स्पर्धेत सहभागी होणा-या खेळाडूंसाठी १४ वर्षाखालील मुले (सबज्युनिअर) स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १ जानेवारी २०१० त्यानंतरचा जन्मलेला असावा. १४ वर्षाखालील मुले/मुली (ज्युनिअर) १ जानेवारी २००७ नंतर जन्मलेला असावा. या स्पर्धा अंतर्गत जळगाव जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल क्रीडा स्पर्धा कार्यक्रमात स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संघांनी जिल्हास्तर स्पर्धा कार्यक्रमानुसार आपले संघ उपस्थित ठेवावे.

 

ज्युनिअर मुले  या गटातील स्पर्धांसाठी २४ जुलै रोजी सकाळी ९ वाजता उपस्थित रहावे. ज्युनिअर मुले गटातील स्पर्धेसाठी २५ जुलै रोजी सकाळी ९ वाजता उपस्थित रहावे.  ज्युनिअर मुली  या गटासाठी २६ जुलै रोजी उपस्थित रहावे. स्पर्धेत सहभागासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथे संघांनी उपस्थित रहावयाचे आहे. अधिक माहिती साठी सुजाता गुल्हाने – ९७६३२३५१४६ यांच्याशी संपर्क साधवा.  स्पर्धेला येतांना प्रवेश अर्ज व त्यासोबत खेळाडूंचा जन्मतारखेचा दाखला जोडून स्पर्धेच्या दिवशी सादर करावा. असे आवाहन श्री.दिक्षित यांनी केले आहे.

Protected Content