जिल्ह्यातील बसस्थानकांमधील विविध प्रश्न सोडविण्याबाबत आ. खडसे यांचा विधानपरिषदेत मागणी

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील बसस्थानकांची दुरावस्था आणि अपुऱ्या बसेस मुळे प्रवाशांना मोठा अडचणींचा सामना करावा लागलत आहे. तसेच कर्मचारी संख्येमुळे रद्द होणाऱ्या बसेस मुळे नागरिकांचे होणारे हाल होत असल्याबाबत माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानसभेत मांडला.  याबाबतीत एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषद मध्ये मांडला. त्यावर मंत्री दादा भुसे यांनी मुक्ताईनगर आणि बोदवड विषयी माहिती घेऊन कळविण्यात येईल असे सांगण्यात आले.

 

गेल्या आठवड्यात रोहिणी खडसे यांनी मुक्ताईनगर बसस्थानकाला भेट देऊन पाहणी केली होती. त्यावेळी बस स्थानकाची दुरावस्था झाल्याचे दिसुन आले होते.

काही दिवसांपूर्वी मानेगाव येथील विद्यार्थ्यांनी वेळेवर बस रद्द करण्यात आल्यामुळे हाल झाल्याचे रोहिणी खडसे यांना सांगितले होते. त्यावर रोहिणी खडसे यांनी आगरप्रमुख यांच्यासोबत संपर्क साधला असता त्यांनी पुरेशी बस संख्या आणि कर्मचारी संख्या नसल्याने बस रद्द कराव्या लागत असल्याचे सांगितले होते.   हि बाब रोहिणी खडसे यांनी आ. एकनाथराव खडसे यांना सांगितली असता त्यांनी हा प्रश्न विधानपरिषद मध्ये मांडेल असे सांगितले होते.

 

माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे  यांनी बस आणि बस स्थानकातील सोयी सुविधा विषयी प्रश्न विधानपरिषद मध्ये मांडला.  जळगाव जिल्हयात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसची संख्या ,आणि अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे प्रवाशांचे विशेषतः विद्यार्थ्यांचे हाल होतात तसेच बसस्थानकांची दुरावस्था झालेली आहे

याबाबतीत आ एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषद मध्ये प्रश्न उपस्थित केला.

 

त्यावर सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम )मंत्री दादाजी भुसे यांनी उत्तर दिले. यावेळी दादा भुसे म्हणाले महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मध्ये प्रवासी संख्या कमी असल्यामुळे बसेस रिकाम्या फिरत होत्या त्यात नुकसान होत होते. त्यासाठी शासनाने महत्वकांक्षी निर्णय घेतले यामध्ये 75 वर्ष वयाच्या लोकांना मोफत प्रवास, 65 ते75 वर्ष वयाच्या नागरिकांना व महिलांना भाड्यात  50 टक्के सुट यामुळे बसेस ला चांगला प्रतिसाद लाभत असून प्रवासी संख्या वाढत आहे. विद्यार्थ्यांना वेळेवर बस उपलब्ध व्हाव्यात यासाठी निश्चितपणे उपाययोजना करण्यात येतील. बस स्थानकांची स्वच्छता करणे, रंगरंगोटी करणे,काँक्रीटीकरण करणे यासाठी सरकारने 400 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे . बिओटी तत्वावर काही नविन उपक्रम राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. मुक्ताईनगर आणि बोदवड विषयी माहिती घेऊन आ एकनाथराव खडसे यांना कळविण्यात येईल असे दादाजी भुसे यांनी सांगितले.

Protected Content