फिडर स्थलांतरित न केल्यास नगरसेवक दारकुंडे यांचा आंदोलनाचा इशारा

जळगाव, प्रतिनिधी । शिवाजी नगर उड्डाण पुलच्या अखत्यारीत असलेले जळगाव शहरांतील शास्त्री टॉवर फिडर व लाकुडपेठ येथील फिडर स्थलांतरीत करण्यात यावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी जिल्हाधिकारी तथा नियोजन समिती सदस्य सचिव अभिजित राऊत यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

वारंवार पत्र व्यवहार करून देखील आद्यपपर्यंत फिडर स्थलांतर करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यासंदर्भातील लेखी स्वरुपातमाहीती द्यावी अन्यथा यासंबंधित असलेले सर्व अधिकाऱ्यांच्या दालनात लोकप्रतिनिधी व शिवाजी नगरातील संबधित नागरीक आंदोलनकरतील असा इशारा देण्यात आला आहे. या मागणीस दीड वर्ष झालेले असुन कोणीही लक्ष घालत नाही.ज्याला सांगितले किंवा पत्र व्यवहार केला ते सांगतात. जिल्हाधिकारी म्हणतात हा अधिकार नियोजन मंडळाकडे आहे. नियोजन मंडळ म्हणते मंत्रालयावर प्रस्ताव पाठविलेला आहे. शहरातील विद्युत मंडळ अधिक्षक सांगतात हा विषय आमच्या अखत्यारीत नसुन तो वरच्या लेव्हला आहे.त्याकरीता आम्हांला लेखी स्वरुपात संपुर्ण नियोजनाची माहीती ८ ते १० दिवसात द्यावी नाहीतर आम्ही नागरीकांसह आपल्या दालनात आंदोलन करू असा इशारा नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी दिला आहे.

Protected Content