जळगावात बेशुध्दावस्थेत आढळून आलेल्या प्रौढाचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । तीन दिवसांपूर्वी पोलिसांना गांधी मार्केट परिसरात बेशुध्द अवस्थेत आलेल्या प्रौढाचा रविवारी उपचार घेत असताना मृत्यू झाला होता. त्यामुळे ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले होते. आज सोमवारी त्या प्रौढाची ओळख पटली असून जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आला असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

सिताराम बाळू तायडे (५०, रा. शाहुनगर) असे मयताचे नाव आहे. २० जून रोजी गांधी मार्केटमधील एका दुकानाजवळ रात्री ८ वाजता अनोळखी प्रौढ बेशुध्द अवस्थेत पोलिसांना आढळून आला होता. त्या प्रौढाला रात्रीच शहर पोलीस कर्मचारी रवींद्र सोनार व भुषण पाटील यांनी उपचारार्थ दाखल केले. दरम्यान, रविवारी त्या प्रौढाचा उपचार घेत असताना मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांनी त्या प्रौढाच्या नातेवाईकांचा शोध सुरू केला होता. अखेर तपास करीत असताना रविंद्र सोनार यांना मयत प्रौढाची पत्नी यांच्याशी संपर्क झाला व सोमवारी त्यांना बोलविण्यात आल्यानंतर पत्नीने जिल्हा रूग्णालयात मृत पतीला ओळखले. शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

Protected Content