पहूर पेठ येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह

पहूर ,ता जामनेर, रविंद्र लाठे । पहूर पेठ येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचे स्वॅब तपासणी अहवाल आज पॉझिटिव्ह आला असून तीन अहवाल निगेटिव्ह आल्याची माहीती नोडल अधिकारी डॉ . हर्षल चांदा यांनी दिली . यामुळे पहूर गावात खळबळ उडाली आहे .

आतापर्यंत पहूर मधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ९ झाली आहे .पहूर येथील रहिवासी असलेल्या वृध्देचा अहवाल औरंगाबाद येथील खाजगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आला होता . त्या महिलेच्या संपर्कात असलेल्या कुटुंबातील आठजणांचे पहूर ग्रामीण रुग्णालयात स्वॅब घेण्यात आले होते . त्यापैकी ५ अहवाल पॉझिटिव्ह तर ३ अहवाल निगेटीव्ह आले आहेत .एकाच कुटूंबातील ५ जणाचे अहवाल पॉझीटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे .दरम्यान पहूर पेठ ग्रामपंचायतीच्या वतीने रहिवासी असलेला परिसर निर्जंतुक करण्यात आला असून प्रतिबंधित करण्यात आला आहे

पहूरकरांनो आतातरी सावध व्हा !
पहूर पेठत दिवसेंदिवस बाधित रूग्ण वाढत असले तरीही नागरिक मोठ्या प्रमाणात तोंडाला मास्क न बांधता फिरताना दिसत आहेत . पानटपऱ्या ,सलुन दुकान, हॉटेल्स या व्यवसायांना ३० जून पर्यंत जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशान्वये बंदी आहे .मात्र जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला याठिकाणी केराची टोपली दाखवली जात आहे. परिणामी सहाजिकच नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढत आहे .बहुतांश लोक शासकीय नियमांचे पालन करीत असले तरी मात्र काही लोकांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असून नियम मोडणाऱ्यांना पोलीस कधी कारवाई करणार ? असा सवाल सुज्ञ नागरिक करीत आहेत .

Protected Content