कोरोना रोखण्यासाठी केंद्राची पंचसूत्री

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोरोना रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकाऱ्यांना 5 सूत्री कार्यक्रम सांगितला. टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेंट, नियमांचं पालन आणि लसीकरण कटीबद्धपणे राबवलं तर प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय.

 

अधिकाऱ्यांनी जनजागृतीवर भर देण्याचे निर्देश पंतप्रधान मोदी यांनी दिले आहेत.

 

देशात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय. विविध राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोना लसीकरण अभियानाचा आढावा घेण्यात आला. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत अधिकाऱ्यांना काही निर्देश दिले आहेत. कोरोनाबाबत जनजागृती आणि अभियानातील त्यांचा सहभाग महत्वाचा असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

 

 

 

 

 

देशभरात 6 ते 14 एप्रिल दरम्यान विशेष मोहीम राबवली जाणार आहे. यात 100 टक्के मास्कचा वापर, वैयक्तिक स्वच्छता आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता किती गरजेची आहे, याबाबत नागरिकांना माहिती दिली जाणार आहे.

Protected Content