जाणून घ्या, हरेन पांड्या खूनप्रकरणाशी संबंधी सगळ्या हकीगत !

images 2

जळगाव (प्रतिनिधी) गुजरातचे माजी गृहमंत्री हरेन पांड्या खून प्रकरणात हायकोर्टाकडून निर्दोष मुक्तता झालेल्या १२ लोकांना शुक्रवारी न्यायधीश अरुण मिश्रा अध्यक्ष असलेल्या खंडपीठाने दोषी ठरविले आहे. हरेन पांड्या खून प्रकरणाला अनेक कांगोरे आहेत. अगदी पांड्या यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी त्यांचे वडील विठ्ठलभाई यांनी मोदींना पार्थिवाला हात लावण्यापासून रोखले होते. एवढेच नव्हे तर, मोदींवर जाहीररित्या खुनाचा आरोपही लावला होता. गुजरात दंगलीची चौकशी करणाऱ्या समितीला पांड्या यांनी दिलेला जवाबापासून ते खुनाचा दिवस आणि काल लागलेला निकाल.’लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ आपल्या वाचकांसाठी हरेन पांड्या यांच्या खून प्रकरणाशी निगडीत संपूर्ण माहिती खालील वृतांतात देत आहे.

 

थोडक्यात न्यायलयीन माहिती

 

गुजरातचे माजी गृहमंत्री हरेन पांड्या खून प्रकरणात हायकोर्टाकडून निर्दोष मुक्तता झालेल्या १२ लोकांना शुक्रवारी न्यायधीश अरुण मिश्रा अध्यक्ष असलेल्या खंडपीठाने दोषी ठरविले आहे. पांड्या यांची हत्या २६ रोजी २००३ मध्ये भरदिवसा खुन करण्यात आला होता. सीबीआयच्या दाव्यानुसार २००२ मधील गुजरात दंग्यांचा बदला घेण्यासाठी पांड्या यांची हत्या करण्यात आली होती. परंतू पांड्या यांचे वडील विठ्ठलभाई यांनी जाहीररीत्या नरेंद्र मोदी यांच्यावर खुनाचा आरोप करत एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. २००७ मध्ये या प्रकरणावर निर्णय देत विशेष न्यायालयाने १२ आरोपींना दोषी ठरवले होते. परंतू २९ ऑगस्ट २०११ मध्ये गुजरात हायकोर्टाने आधीचा निर्णय बदलत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर २०१२ मध्ये हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध सीबीआयने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते.

 

प्रबळ प्रतिस्पर्धी म्हणून पांड्यांसोबत मोदींचा वाद

 

‘कारवां’मॅग्झीनमध्ये ‘बेताज बादशाहः नरेन्द्र मोदी का उदय’ या शीर्षकाखाली २०१२ मध्ये एक विशेष वृतांत प्रकाशित करण्यात आला होता. त्या वृतांत हरेन पांड्या खून प्रकरणाशी संबंधित काही माहिती देण्यात आली होती. त्यानुसार आरएसएसशी संबंधित आणि मिडियामध्ये जबरदस्त संपर्क असलेले उंचपूर्ण आणि तेवढेच सुंदर गुजराती ब्राम्हण हरेन पांड्या हे गुजरात राज्य भाजपात नरेंद्र मोदी यांचे प्रबळ प्रतिस्पर्धी होते. दोघं जण २००१ मध्ये पहिल्यांदा एकमेकाला भिडले. मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केल्यानंतर मोदी हे आपल्यासाठी एक सुरक्षित विधानसभा मतदार संघ शोधत होते. त्यावेळी मोदी हे अहमदाबादमधील एलीसब्रीज मतदार संघातून पोटनिवडणूक लढण्यास इच्छुक होते. कारण भाजपच्या दृष्टीने हा सर्वात सुरक्षित मतदार संघ होता. परंतू हरेन पांड्या आपला पारंपारिक मतदार संघ सोडण्यास तयार नव्हते. तत्कालीन भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने पांड्यांच्या संवादाची आठवण सांगितली. त्यानुसार पांड्या म्हणाले होते की, “मुझे बीजेपी के किसी युवा के लिए यह सीट खाली करने को कहा जाए तो मैं कर दूंगा, लेकिन इस आदमी के लिए नहीं करूंगा.” अर्थात मोदींच्या व्यतिरिक्त पांड्या आपला मतदारसंघ कुणासाठीही सोडायला तयार होते.

 

एसआयडीची पांड्यांवर नजर

 

गुजरातमधील तीन महिन्यानंतर २००२ मध्ये पांड्या गोपनीय पद्धतीने न्यायमू व्ही.आर.कृष्णमूर्ती अय्यर यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित चौकशी समितीकडे आपला जवाब नोंदविला. त्यावेळी मोदींना कळू शकत नव्हते की, पांड्या यांनी काय जवाब नोंदवला. परंतू लिखीत रेकॉर्डनुसार समोर येते की, मोदी यांचे प्रधान सचिव पी.के.मिश्रा यांनी राज्य गुप्त वार्ता विभागाचे महानिदेशक यांना पांड्यांवर नजर ठेवण्यास सांगितली होती. विशेष करून चौकशी संबंधित हालचालीवर बारीक लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले होते.

 

राज्य गुप्त वार्ता विभागाचे महानिदेशकांच्या गोपनीय नोंदी

 

राज्य गुप्त वार्ता विभागाचे महानिदेशक यांनी ७ जून २००२ मध्ये आपल्या गोपनीय रजिस्टरमध्ये लिहून ठेवले आहे की, डॉ.पी.के.मिश्रा यांनी सांगितले आहे की, महसूल मंत्री हरेनभाई पांड्या यांच्या प्रकरणाशी संबंधित आहेत. त्यानंतर त्यांनी ९८२४०३०६२९ हा मोबाईल क्रमांक देत त्याच्या कॉल डिटेल मागितले. पाच दिवसानंतर १२ जून २००२ रोजी पुन्हा गोपनीय रजिस्टरमध्ये एक नोंद आहे. त्यानुसार डॉ.पी.के.मिश्रा यांना माहिती देण्यात आली की, श्री.पांड्या यांनी चौकशी समिती आयोग (न्यायमूर्ति व्ही.आर. कृष्ण अय्यर) यांची भेट घेणारे मंत्री हरेन पांड्या आहेत. त्यांनी हे पण सांगितले की, याबाबत लिखित माहिती दिली जाऊ शकत नाही. कारण सर्व प्रकरण संवेदनशील आहे. तसेच राज्य गोपनीय विभागाच्या कर्तव्याशी बॉम्बे पोलीस मॅन्युअलसोबत जुडलेला नाहीय. पण हे माहित पडले आहे की, ९८२४०३०६२९ हा मोबाईल नंबर हरेनभाई पांड्या यांचा आहे.

 

गुजरात दंगली आधी मोदींच्या घरी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक

थोड्याच दिवसात बातम्यांमधून माहित पडले की, मोदी यांच्या मंत्री मंडळमधील एका मंत्र्याने अय्यर कमिशन समोर आपला जवाब दिला आहे. त्यानुसार गोधरा रेल्वे जाळण्यात आल्याच्या दिवशी मोदी यांच्या घरी झालेल्या बैठकीत मोदी यांनी उच्च पोलीस अधिकारी आणि गुप्तवार्ता विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले होते की, उद्या गोधरा प्रकरणाचा न्याय होईल. हिंदूंच्या कुठली प्रतिक्रिया उमटत असतांना त्यांच्या आड न येण्याचे सांगितले. याच कारणामुळे मोदी यांना पांड्या यांच्याविरुद्ध भाजप अनुशासनहीनतेशी संबंधित प्रकरण तयार करण्याच्या हिशोबाने मुबलक पुरावे मिळाले. २ महिन्यानंतर पांड्या यांना मंत्रिमंडळातून राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले.

 

मोदीजी तोंडावर नाही सांगायची हिंमत ठेवा

 

मोदी एवढ्यात नाही थांबलेत. गुजरातमध्ये डिसेंबर २००२ मध्ये निवडणुका होणार होत्या. या निवडणुकीत पांड्या यांना एलीसब्रीज विधानसभा मतदार संघातून तिकीट नाकारण्याचे प्रमुख कारण मोदी यांना मिळालेले होते. जो मतदार संघ कधीकाळी पांड्या यांनी मोदींसाठी सोडण्यास नकार दिला होता. भाजपमधील एका नेत्यांचे म्हणणे होते की, मोदी कधीच विसरत नाही आणि कधी माफही करत नाही. एका नेत्याने बदला घेण्यासाठी एवढा वेळ मागे लागून राहणे, अशी गोष्ट चांगली नसते. भाजपच्या त्या पदाधिकाऱ्यानुसार पांड्या मोदी यांना भेटण्यास रुग्णालयात गेले होते. पांड्या यांनी मोदी यांना सुनावले होते की, “बुजदिल की तरह सोने का नाटक मत कीजिए. मुझे ”न” कहने की हिम्मत दिखाइए.” थोडक्यात पांड्या यांना मोदींच्या तोंडून तुम्हाला तिकीट देत नाहीय, हे ऐकायचे होते.

 

अखेर मोदी यांनी पांड्यांकडून तो मतदार संघ हिसकावून घेतला, ज्याचे ते मागील १५ वर्षापासून प्रतिनिधित्व करत होते. मोदी यांना असे करण्यापासून भाजप आणि संघच्या नेतृत्वाने असे करण्यास मना केले होते. परंतू मोदी हे आपल्या जागेवर अडून बसले होते. नोव्हेंबरच्या अखेर संघाचे नेते मदन दास देवी हे मोदी यांना भेटण्यास घरी गेले आणि संघ प्रमुख के.एस.सुदर्शन, मोहन भागवत,लालकृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी यांचा निरोप दिला की, वाद घालणे बंद करा. निवडणुकीआधी फुट पाडू नका आणि पांड्या यांना त्यांचा मतदार संघ परत द्या. देवी यांनी मोदी यांच्यासोबत रात्री उशिरापर्यंत चर्चा केली. परंतू मोदी यांनी ऐकले नाही. मोदींना माहित होते की, सकाळ होता बरोबर नागपूरच्या संघ कार्यालय आणि दिल्ली येथून फोन यायला सुरुवात होईल. त्यामुळे रात्रीच ३ वाजेच्या सुमारास तणाव आणि अशक्तपणाचे कारण सांगून गांधी नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल होऊन गेले.

 

तर मोदी व्यक्तिगत स्वार्थासाठी पक्ष आणि संघाला बरबाद करतील : पांड्या

 

पांड्या हे मोदी यांना भेटण्यासाठी गेले होते. घाबरट सारखे झोपण्याचे नाटक करू नका. मला तोंडावर नाही म्हणायची हिंमत ठेवा. परंतू मोदी हे आपला हट्ट सोडायला तयार नव्हते. शेवटी भाजप-संघाच्या लोकांनी माघार घेतली. त्यानंतर दोन दिवसानंतर मोदी रुग्णालयातून बाहेर आले आणि पांड्या यांचा मतदार संघ नवीन नेत्याला देण्यात आला. डिसेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत धार्मिक द्वेषाच्या लहरीवर स्वार होत, मोदी पुन्हा सत्तेत परत आले. दुसरीकडे पांड्या यांनी दिल्ली आणि गुजरातमधील संघाच्या प्रत्येक मोठ्या नेत्याची भेट घ्यायला सुरुवात केली. पांड्या हे प्रत्येकाला सांगत होते की, आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी पक्ष आणि संघाला बरबाद करून ठेवतील. भाजपचे वरिष्ठ नेता पांड्या यांना अजूनही पक्षासाठी एक महत्वपूर्ण नेता मानत होते. त्यामुळेच पांड्या यांना राष्ट्रीय कार्यकारणीचे सदस्य किंवा प्रवक्ता म्हणून दिल्लीत जाणे भविष्यातील राजकारणाच्या हिशोबाने मोदींसाठी नुकसानकारक ठरू शकत होते.

 

पक्षध्याक्षांचा फॅक्स आणि दुसऱ्या दिवशी पांड्यांचा खून

 

तीन महिन्यानंतर मार्च २००३ मध्ये पांड्या यांना पक्षध्याक्षांचा फॅक्स मिळाला की, त्यांना दिल्लीला यायचे आहे. याच्या दुसऱ्याच दिवशी पांड्या यांची अहमदाबादमध्ये भर दिवसा हत्या करण्यात आली. गुजरात पोलीस आणि सीबीआयने दावा केला होता की, गुजरात दंगलीचा बदला काढण्यासाठी पांड्या यांची हत्या झाली आहे. पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआय, लष्कर-ए-तोयबा आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमने एकत्र मिळून पांड्या यांचा खून केलाय. त्यानंतर १२ लोकांना अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर पांड्या यांच्या खुनाचा आरोप ठेवण्यात आला. परंतू सप्टेबर २०११ मध्ये गुजरात हायकोर्टाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करत संपूर्ण प्रकरणाची थेअरी फेटाळून लावली. न्यायमूर्तींनी म्हटले की, तपासात पूर्णपणे हलगर्जी झालेली आहे. हे सगळे आरोप डोळ्यांवर पट्टी बांधून करण्यात आले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या अकार्यक्षमतेबद्दल दोषी ठरविले पाहिजे. यांच्यामुळे अन्याय झाला आहे. अनेक लोकांचा मोठा छळ झाला आहे. याच बरोबर सार्वजनिक संसाधनांचा गैरवापरासोबत न्यायालयांचा वेळ देखील वाया गेला.

 

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेची चौकशी करण्यासाठी याचिका

 

पांड्या यांचे वडील विठ्ठलभाई यांनी जाहीररीत्या मुख्यमंत्री मोदी यांच्यावर आपल्या मुलाच्या खुनाचा आरोप लावला होता. यासंदर्भात एक याचिका दाखल करून मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी केली होती. परंतू सबळ पुराव्यांची कमतरतेचा हवाला देत याचिका फेटाळून लावण्यात आली होती. आर.बी.श्रीकुमार ज्यांनी दंग्याच्या ठीक एक वर्षानंतर राज्याच्या गुप्तवार्ता विभागाचे प्रतिनिधित्व केले, त्यांनी सांगितले होते की, मुख्यमंत्री कार्यालयातून हरेन पांड्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्याची माहिती सतत द्यायला सांगितली होती. झडपीया यांनी सांगितले की, मी असे म्हणत नाही की, मोदी यांनी पांड्या यांची हत्या केली. परंतू हे देखील तेवढेच खरे आहे की, भाजपमध्ये कुणीही मोदींविरुद्ध तोंड उघडले तर तो व्यक्ती राजकीय किंवा शारीरिकदृष्टीने संपून जात असतो.

 

हरेन पांड्या खून आणि तपासाची हकीगत

 

गुजरात पोलिसांच्या तपासानुसार नेहमीप्रमाणे हरेन पांड्या लॉ गार्डन जवळ सकाळी फिरण्यासाठी गेले होते. सकाळी ७:४० वाजता कार पार्क केल्याबरोबर असगर अली नामक व्यक्तीने चालकच्या बाजूच्या खिडकीतून पाच वेळेस गोळीबार केला. असगरच्या माध्यमातून काही कट्टरपंथी गोधरा नरसंहारचा बदला घेऊ इच्छित होते. अवघ्या सहा महिन्यात सीबीआयने तपास पूर्ण केला. सीबीआयचा संपूर्ण तपास फक्त आणि फक्त लॉ गार्डन जवळील सॅडविच विक्रेता अनिल यादरम याच्या साक्षीवर आधारित होता. अनिलने पांड्या यांच्यावर हल्ला करणारा व्यक्ती म्हणून असगर अलीला ओळखले होते. विशेष म्हणजे शहराच्या मध्यभागातील बगीच्या बाहेर राज्याच्या माजी मुख्यमंत्र्याचा मृतदेह छिन्न विच्छिन्न अवस्थेत तब्बल तीन तास पडून असतो. पोलीस घटनास्थळी पोहचल्यानंतरही घटनास्थळाचा पंचनामा किंवा फोटो,व्हिडीओ शुटींग,अशा महत्वपूर्ण गोष्टी करत नाहीत.

 

पांड्या यांच्या मोबाईलचा रेकॉर्ड कुठं गायब झाला?

 

दुसरीकडे हरेन पांड्या यांच्या मोबाईलचा कुठलेही रेकॉर्ड उपलब्ध झाले नाही. वास्तविक बघता कॉल रेकॉर्ड हत्येच्या तपासाच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण माहिती मिळू शकली असती. त्यांना शेवटचा कॉल कोणी केला, अनोळखी नंबर वगैरे महत्वपूर्ण गोष्टी समजू शकल्या असत्या. एस्सार-हच या तत्कालीन मोबाईल कंपनीकडून पांड्या यांचे मोबाईल कॉल रेकॉर्डचा डाटा मागविण्यात आला, तर त्यांनी फक्त जानेवारी आणि फेब्रुवारी २००३ चे रेकॉर्ड दिले. मार्च महिन्याचा रेकॉर्ड फार जुना असल्याचे कारण सांगत माहिती देण्यास नकार दिला. वास्तविक बघता जानेवारी,फेब्रुवारी नंतरचा महिना फार जुना कसा होऊ शकतो? या प्रश्नांचे उत्तर अद्यापही मिळू शकले नाही. वास्तविक बघता ज्याला कोणालाही २००२ च्या गुजरात दंग्यांचा बदला घ्यायचा होता, तर त्यांनी माया कोडनानी, बाबू बजरंगी, गोर्धन जदाफिया अशा लोकांवर किंवा पक्षपात करणाऱ्या पुलिस अधिकाऱ्यांना टार्गेट केले असते. परंतु सर्वात आधी हरेन पांड्या का? याचे उत्तर कोणाकडेही नाहीय.

 

अशी पडली मोदी आणि पांड्यांमध्ये वादाची ठिणगी

 

इंजिनिअर असलेले हरेन पांड्या हे गुजरात भाजपमधील ९० च्या दशकात एक युवा नेतृत्व म्हणून समोर आले होते. ४२ हजाराहून अधिक मताधिक्क्याने पांड्या यांनी एलिसब्रिज विधानसभा मतदार संघातून विजय मिळविला होता. पांड्या थोड्याच दिवसात मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांच्या जवळ गेले आणि गृहमंत्रीपद मिळविले होते. या काळात केशूभाई-वाघेला यांच्यात वादास कारणीभूत ठरलेल्या नरेंद्र मोदी यांना पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत रवाना केले होते. त्यानंतर 2001 भूकंपाच्या घटनेनंतर मोदी यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आले. केशुभाई यांच्या जवळचे म्हणून मोदी यांनी पांड्याना मंत्रिमंडळात घेतले नाही. परंतु पुढील मंत्रिमंडळ विस्तारत त्यांनी पांड्याना सामावून घेतले. याबदल्यात मोदींना मुख्यमंत्रीपदावर राहण्यासाठी पांड्याचा सुरक्षित विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवायची होती आणि येथूनच दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली.

पांड्यांचा जवाब आणि मंत्रीपदाचा राजीनामा

 

न्या. वीआर कृष्ण अय्यर यांच्या नेतृत्वात मे २००२ मधील गुजरात दंग्यांची चौकशी पथक (CCT) हे एक स्वतंत्र शोध पथक तथ्य शोधत होते. या पथकास हरेन पांड्या यांनी गपचूप एक जबाब दिल्यानंतर या जबाबाची बातमी ‘आउटलुक’मध्ये बातमी छापून आली. यानंतर मुख्यमंत्री असलेल्या मोदी यांनी गुजरात राज्याचे गोपनीय विभागाचे महानिदेशक बी श्रीकुमार यांना पांड्या यांच्यावर पाळत ठेवण्यास सांगितले. तर दुसरीकडे तत्कालीन भाजपअध्यक्षांनी हरेन पांड्या यांना कारणे दाखवा नोटीस देत सीसीटीसोबत बोलण्यास सक्त मनाई केली. त्यानंतर ६ ऑगस्ट २००२ रोजी पांड्या यांना मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले.

 

पांड्यांचे तिकीट कापण्यासाठी मोदी रुग्णालयात

 

पुन्हा एकदा आउटलुकने बातमी छापली,यावेळी एका अज्ञात मंत्र्याची मुलाखत छापली होती. मुलाखतीत त्या मंत्र्याने मुलाखती दरम्यान, माझे नाव कळाले तर माझ्या जीवितास धोखा असल्याचे म्हटले होते. कालांतरानंतर त्या मंत्र्याचे नाव हरेन पांड्या असल्याचे समोर आले. डिसेंबर २००२ च्या विधानसभा निवडणुकीत मोदी यांनी हरेन पांड्या यांना उमेदवारी देण्यास नकार दिला. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा नेतृत्वाने नाराजी व्यक्त केली आणि पांड्या यांना उमेदवारी देण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर मोदी अचानक छातीत दुखू लागल्यामुळे दवाखान्यात दाखल झालेत. मोदी यांच्या नाटकापुढे अखेर पक्षश्रेष्ठीने पांड्या यांना निवडणूक न लढण्यासाठी तयार करावे लागले. हा निर्णय जाहीर झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशीच मोदी दवाखान्यातून बाहेर पडले.

 

माझ्या मुलाच्या पार्थिवाला स्पर्श करू नका

 

काही दिवसानंतर भाजपातील एक गटाने पांड्या यांना राज्यसभेवर घेण्याची मागणी केली. पांड्या यांना राष्ट्रीय कार्यकारिणीचा सदस्य म्हणून नियुक्तीचे पत्र २५ मार्च २००३ रोजी मिळाले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे २६ मार्चला पांड्या यांची हत्या झाली. पांड्या यांचे वडील विठ्ठलभाई यांनी मोदी यांच्यावर आपल्या मुलाच्या खूनाचा आरोप लावला. ज्यावेळी मोदी एनएसजी कमांडो सोबत भेटायला गेले त्यावेळी विठ्ठलभाई हे खूप अस्वस्थ झालेत. आपल्या मुलाच्या मृतदेहास मोदी यांना पुष्पहार अर्पण करू देण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. एवढेच नव्हे तर, ‘या शस्त्रधारी कमांडोसोबत याठिकाणी येणे कोणते मोठे काम आहे. तुम्ही येथे का आलात? आम्हाला कोणाच्याही सहानभुतीची गरज नाहीय. कृपया येथून निघून जा, माझ्या मुलाच्या पार्थिवाला स्पर्श देखील करू नका’ अशा शब्दात विठूभाई यांनी मोदींना सुनावले होते.

पांड्या हत्याकांडाचा तपास ठरवून कुणी तरी असफल केलाय का?

गुजरात पोलीस आणि सीबीआईने घोषणा केली की,पांड्या यांची हत्या पाकिस्तानच्या इंटर सर्विसेज इंटेलिजेंस, लश्कर-ए-तैयबा आणि दुबई स्थित अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांनी संयुक्तरित्या केलीय. पांड्या यांच्या हत्येसंदर्भात १२ लोकांना अटक करण्यात आली. परंतु आठ वर्षानंतर सप्टेबर २०११मध्ये गुजरात उच्च न्यायालयाने सर्वाना निर्दोष मुक्त करत संपूर्ण प्रकरणच फेटाळून लावले. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारीतील प्रभावशाली पद स्वीकारण्यापूर्वी हरेन पांड्या यांची हत्या केल्याने सर्वात जास्त फायदा कोणाचा होणार होता? जो व्यक्ती दंग्यांचे खरे तथ्थ तपास पथकाला सांगत होता. त्याची हत्या कट्टरपंथी का करतील? राज्याच्या माजी गृहमंत्र्याच्या हत्येचा तपास पोलीस इतक्या निष्काळजीने कसा करू शकतात? मुळात पांड्या हत्याकांडाचा तपास ठरवून कुणी तरी असफल केलाय का? हाच खरा प्रश्न उपस्थित होतो.

Protected Content