माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या तालुका अध्यक्षपदी किरण पाटील

 

पाचोरा, प्रतिनिधी । जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या तालुका अध्यक्षपदी कृष्णापुरी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक किरण लक्ष्मण पाटील यांची निवड करण्यात आली.

जळगाव जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या त्रैवार्षिक निवडणूक नुकतीच घेण्यात आली. निवडणुकीत पाचोरा तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी किरण पाटील, यांची तालुक्यातून बिनविरोध निवड केली. या निवडणुकीत निवडणूक निरिक्षक म्हणून नेरी ता. जामनेर शाळेचे मुख्याध्यापक आर. ए. पाटील यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. तुळजाई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष किरण पाटील यांचे अभिनंदन व स्वागत केले. त्याचप्रमाणे तुळजाई शिक्षण मंडळ संचालित सर्व माध्यमिक प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Protected Content