धक्कादायक : विधवा महिलेवर चुलत दीराकडून अत्याचार; तीन जणांवर गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विधवा झालेल्या वहिनीला लग्नाचे आमिष दाखवत वारंवार अत्याचार करून ७४ लाख रूपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना पाचोरा तालुक्यात घडली आहे.  याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील एका गावात राहणारी विवाहितेचे पती यांचे कोरोनामुळे दिड वर्षांपुर्वी मयत झाले आहे. विधवा महिला मुलीसह माहेरी न जाता सासरी येथे वास्तव्याला आहे. दरम्यान पतीच्या निधनानंतर महिलेला ७४ लाख रूपये मिळणार असल्याची माहिती महिलेच्या चुलत दिराला माहित पडले. त्यानंतर चुलत दीर आणि सासू,सासऱ्याने फसवणुक करण्याचा कट रचुन संगनमताने महिलेच्या आई वडिलांकडे जावु न देता लग्नाचे आमीष दाखविले. पीडीता लग्नानंतर शारिरीक संबंध ठेवु असे सांगत असताना देखील वेळोवेळी शारिरीक संबंध ठेवुन चुलत दिराने महिलेवर बलात्कार केला. तसेच अद्यापपर्यत लग्न केले नाही व लग्नासही नकार दिला. तसेच चुलत सासरे व दिर अशा तिघांनी मिळून महिलेचा विश्वास संपादन केला. दरम्यान, वेगवेगळे बहाने करुन महिलेच्या पतीच्या खात्यातील रक्कम ७३ लाख ६४ हजार ५०१ रुपये वळती करुन घेतले. एवढेच नाहीतर महिलेच्या मुलीचे ११२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने सुद्धा ठेवून घेतले. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किसन सज्जनराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील करीत आहेत.

Protected Content