लस उपलब्ध नसल्यामुळे सर्व केंद्र उद्या राहणार बंद- डॉ. राम रावलाणी

जळगाव प्रतिनिधी । कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लसीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. सद्यास्थितीला लस उपलब्ध नसल्याने २५ रोजी महापालिकेचे सर्व लसीकरण केंद्र बंद राहणार असल्याची माहिती मनपाचे प्रमुख वैद्यकिय अधिकारी डॉ. राम रावलाणी यांनी दिली.

जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या जरी असली तरी यातील संकट अजून कायम आहे. नागरीकांनी गाफील न राहता आपल्यासह आपल्या कुटुंबियांची जाबाबदारी घ्यावे, कोरोनावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील गेल्या चार महिन्यांपासून लसीकरणाला सुरूवात करण्यात आली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ५५ हजार ७६९ जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लसीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. 

मात्र गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात लसीचा तुटवडा निर्माण होत आहे.  मागील आठवड्यातही जळगाव शहरातील लसीकरणाचे केंद्र बंद होते.  सध्यास्थितीत जिल्ह्यात लसीचा साठा उपलब्ध नसल्यामुळे मंगळवारी २५ मे रोजी महापालिकेचे सर्व लसीकरण केंद्र बंद राहणार आहे. अशी माहिती महापालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलाणी यांनी सोमवारी सायंकाळी दिली.

Protected Content