फसवणूक करून फरार झालेल्यास अटक

जळगाव प्रतिनिधी । शासकीय अनुदानाची रक्कम परस्पर वर्ग करून फरार झालेल्याला एलसीबीच्या पथकाने अखेर अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे की, दीपक नीळकंठ जावळे (२७, रा. नितीन साहित्यानगर, सुप्रीम कॉलनी) याने महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत प्रमोद महाजन कौशल्य उद्योजक विकास अभियान अंतर्गत शैक्षणिक संस्था सुरू करून देण्यासाठी भारती गजेंद्रसिंग परदेशी (रा. रायपूर, ता. जळगाव) यांच्याकडून आवश्यक ते कागदपत्र घेऊन संस्थेची नोंदणी केली होती. यानंतर संबंधीत प्रशिक्षण संस्थेला मिळणारे ४७ लाखाचे शासकीय अनुदान परस्पर लाटून घेतले होते. या आशयाची तक्रार सौ. भारती परदेशी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिली होती.

या फिर्यादीनुसार १ फेब्रुवारी २०१९ रोजी भूषण गणेश बक्षे, शीतल भगवान पाटील यांच्यासह सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. तपास व चौकशीअंती तपास अधिकारी पोलिस उपनिरिक्षक संदीप पाटील यांनी जावळे याला या गुन्ह्यात आरोपी केले होते.

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून दीपक जावळे फरार होता. तो जळगावात असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकोल, राजेश मेढे, प्रदीप पाटील, महेश महाजन, संतोष मायकल यांच्या पथकाने दीपक जावळे याला अटक केली आहे. पुढील तपासासाठी त्याला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तर, जावळे याने केलेल्या फसवणुकीची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता असून पोलीस चौकशीतून याबाबतची माहिती समोर येऊ शकते.

Protected Content