निजामुद्दीन कनेक्शन फॅक्ट चेक : ‘त्या’ १३ जणांसोबत ‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’चा संवाद !

 

जळगाव प्रतिनिधी । जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील १३ जणांची दिल्लीत मोबाईल लोकेशनची पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांचा थेट निजामुद्दीन येथे तबलिगी जमातीच्या झालेल्या कार्यक्रमाशी संबंध जोडण्यात येत होता. परंतू या लोकांशी ‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’ ने संपर्क साधला असता प्रत्येकाच्या वेगळ्याच धक्कादायक कथा समोर आल्या आहेत. एकंदरीत फक्त ‘मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग’ मुळे सर्व संशयकल्लोळ निर्माण झाल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, यामुळे संबंधित लोकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागतेय.

 

जिल्ह्यातील १३ जणांचे ‘निजामुद्दीन कनेक्शन’ असल्याचे वृत्त पसरले होते. दिल्ली येथील निजामुद्दीन येथे कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही जणांना कोरोना झाल्याचे  समोर आले होते.  त्यामुळे जळगाव जिल्ह्यात भीतीचे वातावरण पसरले होते.  परंतु ‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’ ने केलेल्या पडताळणीत हा दावा सिद्ध झालेला नाही. या १३ लोकांमधील ७ जण हे गैरमुस्लीम आहे. त्यामुळे त्यांचा ‘मरकज’शी दुरान्वये संबंध नसल्याचे स्पष्ट झालेय.

 

‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’ चा १३ लोकांशी झालेला संवाद

 

१) आम्हाला कालपासून पोलीस, पत्रकार यांचे सतत फोन येत असल्याने सर्व माहिती आगोदरच दिली आहे. दिल्ली प्रवासाच्या संदर्भात प्रशासनाला योग्य माहिती दिली आहे. दरम्यान, हा व्यक्ती दोन दिवसापासून सतत येणाऱ्या फोनमुळे प्रचंड भेदरलेला होता.

 

२) फोन उचलला नाही

 

३) हे नाशिकचे रहिवाशी असून आपल्या ४ सहकाऱ्यांसह १४ रोजी दिल्लीसाठी प्रवासाला सुरूवात केली होती. १५ रोजी दिल्लीत पोहचले. काम आटोपल्यानंतर १७ रोजी सायंकाळी ४ वाजता अजमेरला जाण्यासाठी रेल्वेने रवाना झाले. १८ रोजी मुंबई येथे आले. सध्या ते नाशिक येथे राहतात. त्यामुळे त्यांचा जळगाव जिल्ह्यात राहण्याचा काहीही संबंध नाहीय.

 

 

४) हे मुळ अट्रावल ता. यावल येथील रहिवाशी असून पुण्यात एका शासकीय विभागात स्फॉटवेअर इंजिनिअर आहे. सरकारी अधिकारी असल्याने आपल्या ४ सहकाऱ्यांसोबत पुणे ते दिल्ली विमानाने १४ रोजी गेले. दिल्ली विमानतळातून आग्रा येथे जाण्यासाठी कारने गेले. मात्र लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर ते पुन्हा पुण्याकडे रवाना झाले. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पुण्यातील शासकीय रूग्णालयात जावून तपासणी करून घेतली आहे. सर्व मेडीकल रिपोर्ट नॉर्मल असल्याचे सांगितले.

 

 

५) जळगावचा नंबर म्हणून प्रसिद्ध करण्यात आलेल्या संपर्क साधला असता तो नंबर नाशिक येथील व्यक्तीचा निघाला. त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, ते १५ तारखेला दिल्ली येथे त्यांच्या मिंत्रांसोबत पर्यटनासाठी गेले होते. दिल्लीत एक दिवस थांबून त्यांनी लाल किल्ला बघितला. यानंतर ते पुढे अजमेर शरीफ दर्गा येथे जाऊन आशीर्वाद घेत ते सर्व जण १८ मार्च रोजी नाशिक येथे परत आलेत. हे व्यक्ती देखील नाशिक येथे राहत असल्यामुळे त्यांचा जळगावशी संबंधी नाहीय.

 

६ ) एरंडोल तालुक्यातील हा व्यक्ती दिल्लीत नौकरी करतो. सध्या देखील मी दिल्लीतच असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हा व्यक्ती जळगावात आला नसल्याचे स्पष्ट झालेय.

७ ) अस्थायी स्वरुपात बंद

 

८) या मोबाईल नंबरवर संपर्क साधले असता, हा नंबर उत्तर प्रदेश आजमगढ येथील निघाला. त्यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितले की, ते देशात लॉकडाऊन लागू होण्यापूर्वीच दिल्ली येथून आजमगढला त्यांच्या घरी परतले होते. त्यांना दिल्ली सोडून १२ ते १५ दिवस झाले असल्याचीही माहिती त्यांनी सांगितली.

९) या नंबर फोन केला असता हा नंबर चाळीसगाव तालुक्यातील परंतू सध्या दिल्ली येथे सीआरपीएफ जवान म्हणून कार्यरत असणाऱ्या जवानाचा निघाला. या जवानाची बदली झाल्यानंतर तो फेब्रुवारी महिन्यापासून दिल्ली नोयडा येथे आपल्या कंपनी सोबत राहतोय.

 

१०) हा मोबाईल नंबर भुसावळ येथील व्यक्तीचा असून ते रेल्वेत अधिकारी आहेत. ७ मार्च पासून शिमला, कुलू-मनाली येथे फिरायला गेले होते. ते १६ मार्च रोजीच भुसावळमध्ये परतले आहेत. मुळात रेल्वे बदलवण्यापुरता त्यांची गाडी दिल्ली स्थानकावर आली होती. त्यामुळे त्यांचा दिल्ली शहरात जाण्याचा विषयच आला नाही. विशेष म्हणजे कामावर हजर होण्यापूर्वी त्यांची तपासणी देखील झालीय.

 

११) हा मोबाईल नंबर धरणगाव तालुक्यातील दाखवत होता. परंतु हा नंबर दिल्लीतील व्यक्तीचा आहे. सतत फोन असल्यामुळे या व्यक्तीला प्रचंड मनस्ताप झाला होता. मी दिल्लीचा रहिवाशी असून माझा जळगावशी संबंध नाही, असे त्या व्यक्तीने सांगीतले.

 

१२) हा व्यक्ती यावल  तालुक्यातील असला तरी, लॉकडाऊन झाल्यापासून तो दिल्लीतच अडकलेला आहे. अद्यापही आपण दिल्लीतील एका ठिकाणी थांबलो असून आपली तब्येत चांगली असल्याचे त्यांनी बोलतांना सांगितले.

 

१३) या व्यक्तीने फोन कट करून नंतर संपर्क साधतो, असा संदेश पाठविला. परंतू वृत्त प्रकाशित होईपर्यंत  त्यांचा संपर्क झालेला नव्हता.

 

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content