पतसंस्थेत अपहार : संस्थेच्या चेअरमनला अटक

चोपडा प्रतिनिधी । आपल्या पतसंस्थेतील ठेविदाराची बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर कर्ज काढून अपहार करणार्‍या येथील मराठा समाज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन किरण देशमुख यांना अटक करण्यात आली आहे.

या संदर्भात वृत्त असे की, तालुक्यातील हातेड येथील शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक युवराज नामदेव बाविस्कर(वय ७२) यांनी पतपेढीत ठेवलेल्या ठेवींवर बनावट सह्या व कागदपत्रे तयार करून मराठा समाज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन किरण देशमुख यांनी स्वत: त्यावर कर्ज काढून २ लाख ८७ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी दि.२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात चेअरमन किरण देशमुख (वय ५२ रा. बोरोले नगर,चोपडा) यांना अटक करण्यात आली आहे.

या संदर्भात वृत्त असे की, तालुक्यातील हातेड येथील शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक युवराज नामदेव बाविस्कर(वय ७२) यांनी चोपडा शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. यात म्हटले आहे की, किरण देशमुख हे ओळखीचे असल्याने त्याच्यावर विश्‍वास ठेवून मराठा समाज नागरी सहकारी पतसंस्थेत मी १ लाख ४६ हजार ९४६ रुपये, २ लाख २६ हजार ८८६५ रुपये व ६१ हजार ९४४ रुपयांच्या तीन मुदत ठेवींच्या पावत्या ४६ दिवसा करीता केल्या होत्या. त्या २०११ ते २०१८ पावेतो ठेवी नूतनीकरण करीत गेलो. सन २०१८ पतपेढीचे व्यवस्थापक मनोज बन्सीलाल विसावे यांना समक्ष भेटुन मी वरील रक्कमेच्या ठेवी व त्यावरील व्याजाची रक्कम मला मिळावी म्हणून मागणी केली.

त्यावर व्यवस्थापक मनोज विसावे यांनी सांगितले की, मी २० एप्रिल २०११ रोजी ठेवलेल्या ठेवींवर एक लाख कर्ज घेतले असून त्यावर ९० हजार ४८० रुपये व्याज, तसेच दुसर्‍या ठेवींवर १ लाख ८० कर्ज त्यावरील व्याज १ लाख ५४ हजार ७० रुपये तसेच तिसर्‍या ठेवींवर ५० हजार कर्ज घेतले असून त्यावर ४३ हजार २१ रुपये व्याज असे एकूण २ लाख ८७ हजार ५७१ रुपये थकीत असल्याची माहिती दिली. यावर मी कर्ज घेतलेले नसून माझ्यावर पतसंस्थेचे कोणतेही घेणे नाही, असे व्यवस्थापक विसावे यांना मी सांगितले असता त्यांनी मला माझ्या बनावट सह्या व कागदपत्रे असलेले कर्ज प्रकरण दाखवले.

याबाबत चेअरमन किरण देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर तपास केला असता चेअरमन किरण देशमुख यांनी माझ्या बनावट सह्या करून कर्ज घेतल्याचे दिसून आले. अर्थात पतसंस्थेच्या चेअरमननेच हा अपहार केल्याचे दिसून आले आहे. या फिर्यादीनुसार किरण देशमुख यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

Protected Content