कुसुंबा येथील रिक्षा चालकाला बेदम मारहाण; दोघांविरोधात पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । पोलीसांना सांगून मित्रांची दारू पकडल्याच्या संशयावरून दोघांनी रिक्षा चालकाला मारहाण करून बेदम मारहाण केल्याची घटना आज दुपारी कुसुंबा येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात दोघा भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, रिक्षा चालक हर्षल प्रदीप तोमर (वय-२३) रा. सदगुरू नगर, कुसुंबा ता.जि.जळगाव हा आज सकाळी २५ एप्रिल रोजी १.३० वाजेच्या सुमारास घराजवळील सोपान चंदुसिंग राजपुत याचे घराजवळ गाय गेल्याने तिला घेण्यासाठी गेले असता सोपान चंदुसिंग राजपुत, आकाश चंदुसिंग राजपुत यांनी जवळ येवून सांगितले की माझा मित्र विशाल सुरवाडे यांची दारू तुझ्यामुळे पकडली गेली. तुच पोलीसांचा खबऱ्या आहे, साला तुला जास्त झाले आहे असे बोलून दोन्ही भावांनी हर्षल तोमरला मारहाण केली. हर्षलला मारहाण करत असल्याने भाऊ भुषण तोमर आणि बेबीबाई तोमर हे आवरण्यासाठी आले. यावेळी सोपान याने घरातून बिअरची बाटली आणून हर्षलच्या डोक्यात मारून जखमी केले. तसेच पोलीसात तक्रार गेला तर याद राख अशी धमकी दिली. जखमीवस्थेत हर्षलला गोदावरी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. हर्षल तोमर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात सोपान राजपुत आणि आकाश राजपुत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Protected Content