जळगावातील विसनजीनगरातून दुचाकीची चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद

जळगाव प्रतिनिधी । शहरातील विसजनी नगरात पार्किंगला लावलेली दुचाकी दोन जणांनी दुचाकी चोरून नेल्याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हरीष गिरधर भोळे (वय-३५) रा. मढी पेठ मित्र आसोदा ता‍.जि. जळगाव यांचे डॉ. पराग चौधरी यांच्या हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. दररोज प्रमाणे कामावर विसजनजी नगरात दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीडी २१०९)ने १८ जुलै रोजी सकाळी १० वाजता आले होते. हॉस्पिटलसमोर दुचाकी लावून कामावर निघून गेले. सायंकाळी ६.३० वाजता घरी दुचाकीजवळ आले असता त्यांना दुचाकी मिळून आली नाही. त्यांनी दुकानासमोर असलेले सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता दोन अज्ञात व्यक्ती सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास पिवळा शर्टघातलेला व्यक्ती दुचाकीजवळ येवून दुचाकीच्या हालचाली केल्यात. त्यानंतर तो तेथून निघून गेला. त्या दुचाकीची टेहाळणी करण्यासाठी दुसरा व्यक्ती बनियान घातलेला आणि तोंडाला रूमाल बांधून दुचाकीजवळ आला. थोड्यावेळात हरीष भोळे यांची दुचाकीला किक मारून घेवून निघून गेला. अर्ध्यातासाभरानंतर तोच व्यक्ती पुन्हा स्वत:ची दुचाकी घेण्याकरीत आला दुचाकी घेवून निघून गेला.

संशयित चोरटा सीसीटीव्हीत कैद
डॉ. पराग चौधरी यांच्या हॉस्पिटलसमोर दोन वर्षांपूर्वी हाच संशयित आरोपी जीवन गोकुळ पाटील रा. भोकर कठोरा ता.जि.जळगाव याने दुचाकी चोरी केली होती. त्यावेळी त्यांचा नागरिकांनी चांगला चोप दिला होता. दरम्यान पुन्हा दुचाकी चोरी करतांना सीसीटीव्हीत कैद झाला आहे. संशयित आरोपी जीवन पाटील यांच्यासह एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Protected Content