दिव्यांग प्रमाणपत्रासाठी लाच घेणाऱ्या पंटरसह व्यापारी एसीबीच्या जाळ्यात

जळगाव प्रतिनिधी । दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी चोपडा ग्रामीण रूग्णालयाच्या आवारात खासगी पंटरसह एका व्यापाऱ्याला १० हजाराची लाच घेतांना जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे.

 

याबाबत माहिती अशी की, तक्रारदार हे पारोळा तालुक्यातील असून ते हाताने दिव्यांग आहेत. त्यांना  हाताचे ४० टक्क्यांवर दिव्यांगबाबतचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी दहा हजारांची लाच मागणी  खाजगी पंटर अनिल तुकाराम पाटील (46, रा.नगरदेवळा, ता.पाचोरा) तर व्यापारी विजय रूपचंद लढे (67, रा.नगरदेवळा, मारवाडी गल्ली, ता.पाचोरा) यांनी केली. याबाबत तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागात तक्रार दिली. यासंदर्भात आज लाचलुचपत विभागाने चोपडा ग्रामीण रूग्णालयाच्या आवारात सापळा रचून पंटर अनिल पाटील आणि व्यापारी विजय लढे यांना दहा हजाराची लाचेची रक्कम स्विकारतांना रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे चोपडा शहरात खळबळ उडाली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

 

यांनी केली कारवाई

अपर पोलीस अधिक्षक शशिकांत एस. पाटील, पो.नि. संजोग बच्छाव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील,पो.हे.कॉ.अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी,पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ.महेश सोमवंशी, पो.कॉ.नासिर देशमुख, पो.कॉ.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ यांनी कारवाई केली.

Protected Content