अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याना परिक्षेच्या अनुषंगाने ऑनलाईन विकल्प भरण्यासाठी पुन्हा मुदतवाढ

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या (बॅकलॉगसह) विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अनुषंगाने विकल्प अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी आता पुन्हा दोन दिवस म्हणजे १९ सप्टेंबर, २०२० पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या ई-सुविधा अकांउटमध्ये विकल्प पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यापुर्वी १७ सप्टेंबर मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र विद्यार्थ्यांना येत असलेल्या तांत्रिक अडचणींचा विचार करता विद्यापीठाने पुन्हा १९ सप्टेंबर पर्यंत मुदत वाढवून दिली आहे.

विकल्प अर्ज भरून देणेसाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाऊन ई-सुविधा अकाऊंटमध्ये Willingness to Appear in Exam या Link ला Click करून विकल्प सादर करायचा आहे. सदर Willingness Form फक्त २०१९-२० मध्ये पदवी, पदविका आणि पद्व्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतीम वर्षात प्रविष्ठ असलेल्या किंवा अंतिम वर्ष उत्तीर्ण / अनुत्तीर्ण होऊन मागील सत्र / वर्षातील असलेल्या विद्यार्थ्यांनी भरावयाचे आहे.

अध्यादेश ६७ नुसार Mercy संधी आणि अध्यादेश १७४ नुसार श्रेणी / गुणवत्ता सुधार अशा विद्यार्थ्यांची परीक्षा ऑक्टोबर, २०२० मध्ये होणार नसून त्यांना पुढील परीक्षेच्या वेळी संधी दिली जाणार आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी उपरोक्त Willingness Form भरू नये. जर विद्यार्थ्यांनी चुकीने भरला असल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही. अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी. पाटील यांनी दिली आहे.

Protected Content