रस्ते विकासासाठी ४५ कोटीच्या कामांना मान्यता ! – मंत्री गुलाबराव पाटील

जि.प. रस्त्यांसाठी ११ कोटी तर रस्ते व पुलांसाठी ३४ कोटीं निधी मंजूर !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधवेशना दरम्यान पुरवणी बजेट अंतर्गत जळगाव ग्रामीण मतदार संघात रस्ते व पुलंच्या बांधकामासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने सुमारे ४५ कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. यात जिल्हा परिषदेचे ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्गांसाठी ११ कोटी तर , सार्वजनिक बांधकाम विभागा अंतर्गत येणारे प्रमुख जिल्हा मार्ग रस्ते व त्यावरील पुलांच्या विकासाकरिता ३४ कोटी निधीचा समावेश आहे. रस्त्यांच्या विकासातून शेतकऱ्यांचे हित साध्य होणार असून दळणवळणाची साधने चांगली उपलब्ध असतील तर रोजगार व उद्योग वाढीला चालना मिळते. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यात व मतदारसंघात रस्त्यांचे जाळे विणले गेले आहे. रस्ते विकासासाठी पालकमंत्र्यांचा झंझावाताने रसे विकासास मदत होणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

सा.बां.चे रस्ते व पुलांसाठी सुमारे 34 कोटी निधी मंजूर !
धरणगाव तालुक्यातील, आहिरे गावालगत अंजनी नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करणे – 7 कोटी, अंजनी नदीवर वाघळूद बु. गावाजवळ वर मोठ्या पुलाचे बांधकाम करणे – 3 कोटी 96 लक्ष, नारणे ते नांदेड रस्ता प्रजीमा-52 ची रुंदीकरणासह सुधारणा करणे – 3 कोटी , रामा – 41 ते निशाणे रस्ता प्रजिमा – 50 ची सुधारणा करणे – 1 कोटी 90 लक्ष , चावलखेडा – SH06 – भोद फाटा रस्ता प्रजिमा – 50 ची सुधारणा करणे – 3 कोटी , तर जळगाव तालुक्यातील फुपनगरी ते ममुराबाद गिरणा पंपिग रस्ता रा.मा. 38 चे जलनिस्सारणासह रुंदीकरण व डांबरीकरण करणे – 5 कोटी , विटनेर ते वराड रस्ता प्रजिमा – 08 चे जलनिस्सारणासह मजबुतीकरण करणे – 3 कोटी, जवखेडा ते वडली आणि पाथरी ते म्हसावद रस्ता प्रजिमा-08 चे जलनिस्सारणासह मजबुतीकरण करणे – 3 कोटी, आसोदा ते देऊळवाडे रस्ता. प्रजिमा – चे मजबुतीकरण करणे – 3 कोटी असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्यांसाठी 34 कोटी निधीच्या रस्त्यांना मान्यता मिळाली आहे.

जिल्हा परिषदेच्या रस्त्यांसाठी 11 कोटी निधी मंजूर !
धरणगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 16 रस्त्यांच्या व मोऱ्या बांधकामासाठी 11कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. यात वाघळूद बु. ते बोरखेडा रस्ता ग्रा. मा. 32 चे जलनिस्सारणासह मजबुतीकरण व डांबरीकरण करणे – 90 लक्ष, नांदेड ते धुरखेडा रस्ता ग्रा.मा. 49 चे जलनिस्सारणासह मजबुतीकरण व डांबरीकरण – 1 कोटी, चांदसर ते निंभोरा रस्ता ग्रा.मा. 155 चे जलनिस्सारणासह मजबुतीकरण व डांबरीकरण – 90 लक्ष, एकलग्न ते बोरखेडा रस्ता ग्रा. मा. 16 चे जलनिस्सारणासह मजबुतीकरण व डांबरीकरण – 90 लक्ष, शेरी ते निमखेडा रस्ता ग्रा. मा. 150 चे जलनिस्सारणासह मजबुतीकरण व डांबरीकरण – 90 लक्ष, वराड ते पोखरी रस्ता ग्रा. मा. 05 चे जलनिस्सारणासह मजबुतीकरण व डांबरीकरण – 90 लक्ष, चांदसर ते कवठळ रस्ता ग्रा. मा. 156 चे जलनिस्सारणासह मजबुतीकरण व डांबरीकरण – 90 लक्ष, शेरी ते पथराड बु रस्ता रस्ता ग्रा. मा. 158 चे जलनिस्सारणासह मजबुतीकरण व डांबरीकरण- 90 लक्ष, घुरखेडा – नारणे – कामतवाडी – पष्टाणे रस्ता इजिमा 120 चे जलनिस्सारणासह मजबुतीकरण व डांबरीकरण – 1 कोटी, अंजनविहीरे ते वाकटुकी रस्ता ग्रा.मा. 162 चे जलनिस्सारणासह मजबुतीकरण व डांबरीकरण – 1 कोटी , चावलखेडा – अनोरे रस्ता ग्रा. मा.136 चे जलनिस्सारणासह मजबुतीकरण व डांबरीकरण – 90 लक्ष , कल्याणे खु. ते माळपिंप्री रस्ता ग्रा. मा.141चे जलनिस्सारणासह मजबुतीकरण व डांबरीकरण – 90 लक्ष असे 11 कोटींचा निधीस मान्यता मिळाली असून यातील बहुतांश रस्ते हे शेतकऱ्यांसाठी महत्वाचे असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

“दरम्यान, या संदर्भात बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, रस्ते व पूल मजबुत असतील तर वाहने गतीमान होऊन वेळेची बचत होते. चांगले पूल व रस्ते हे फक्त दळण – वळणासाठी नाही तर शेतकऱ्यांचे आयुष्य सुकर करण्यासाठी देखील उपयुक्त आहेत. पुलाच्या कामांमुळे गावं जोडली जावून रस्ते विकासामुळे गावा – गावा पर्यंत आरोग्य, शिक्षण व रोजगार पोहचतो. दर्जेदार रस्ते व पूल करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असून या अनुषंगाने मतदार संघातील जि. प. चे शेती रस्ते व सा. बा. चे रस्ते व पुलांसाठी 45 कोटी रूपयांच्या कामांना मंजुरी मिळाल्याचे ना. गुलाबराव पाटील म्हणाले.

Protected Content