जळगावात चार ठिकाणी घरफोडी; रामानंद नगर, एमआयडीसी पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोक जीव मुठीत घेऊन एकएक दिवस जगत असताना चोरट्यांना या विषाणूचे गांभीर्य नसल्याने ते बंद असलेली घरे, दुकाने फोडत असल्याचे प्रकार सुरू झाले आहे. शहरात एकाच दिवशी चार ठिकाणी डल्ला मारीत हजारोंचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे़ यात रामननगरात तीन ठिकाणी तर पिंप्राळ्यात एका ठिकाणी चोरी झाली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळे, राज्य सरकार कडून संचारबंदी आणि जमावबंदीचे आदेश जाहीर करण्यात आले. या आदेशाचे उल्लंघन करणाºया रहिवासीयांवर कडक कारवाई पोलीस विभागाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सर्व रहिवाशी लॉकडाऊनमध्ये घरात बसत आहे. याच संधीचा फायदा चोरट्यांनी घेतला आहे. रस्ते आणि सोसायटी परिसर निर्मनुष्य असल्यामुळे, चोरट्यांनी चोरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. याच संधीचा फायदा घेत शहरातील रामनगरात कुटूंबीयांसह वास्तव्यास असलेले अमीन पटेल यांची दुमजली इमारत आहे़ खालच्या मजल्यावर रिक्षाचालक अमीन पठाण हे भाड्याने कुटूंबीयांसोबत राहतात़ तर शेजारी रज्जाक देशमुख हे राहतात़ अमीन पटेल यांचे किरणा दुकान आहे़

किराणा दुकानातील साहित्य, चांदी, रोकड लंपास
अमीन पटेल यांचे किरणा दुकान असल्यामुळे दुकानातील साहित्य घराजवळी बोळीत ठेवलेले होते़ तर खालच्या मजल्यावर राहत असलेले अमीन पठाण हे रामेश्वर कॉलनीमध्ये कुटूंबासोबत आईकडे चार ते पाच दिवसांपासून गेलेले असल्यामुळे त्यांचे घर बंद होते़ त्याचबरोबर शेजारी राहत असलेले रज्जाक देशमुख हे सुध्दा गावी गेल्यामुळे त्यांचे घर कुलूप बंद होते़ दरम्यान, कुलूप बंद पाहून चोरट्यांनी गुरूवारी मध्यरात्री अमीन व रज्जाक यांच्या घराचे कुलूप तोडून रोकड तसेच काही दागिने चोरून नेले़ तर अमीन पटेल यांचे बोळीत ठेवलेले किराणा साहित्य सुध्दा लंपास केले़

शुक्रवारी सकाळी ६ वाजता अमीन पटेल यांच्या आईला जाग आल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला़ मात्र, उघडता आला नाही़ मागच्या दरवाजाने बाहेर आल्यानंतर किराणा दुकानातील साहित्य चोरीला गेल्याचे दिसून आले़ त्यांनी लागलीच मुलगा अमीन याला सांगितले़ दरम्यान, चोरट्यांनी चोरी करण्याआधी अमीन यांच्या घराच्या दरवाजाची कडी लावल्याचा प्रकार यातून उघड झाला़ भाडेकरू व शेजारी वास्तव्यास असलेले देशमुख यांचे घरी फोडल्याचे दिसताच पटेल यांनी त्वरित दोघांना संपर्क साधून चोरी झाल्याची माहिती दिली़

कपाट फोडलेले तर सामान फेकले अस्ताव्यस्थ
पटेल यांचे सुमारे नऊ ते दहा हजार रूपयांचे साबण तसेच इतर किरणा साहित्य चोरीला गेल्याचे पाहणीत आढळून आले़ तसेच चोरट्यांनी काही अंतरावर किराणा साहित्य असलेले खोके फेकल्याचेही पटेल यांना पाहणीत दिसून आले़ काहीवेळानंतर भाडेकरू अमीन पठाण व शेजारी राहणारे रज्जाक देशमुख हे घरी आल्यानंतर त्यांनाही घरातील कपाट व सामान अस्ताव्यस्थ फेकलेले दिसून आले़ पठाण यांच्या घरातून चोरट्यांनी सहा हजार रूपयांची रोकड, तीस ते चाळीस हजारांचे चांदीचे दागिने तर देशमुख यांच्या घरातून रोख ५ हजार रूपये व १० हजार रूपयांचे चांदीचे दागिने लंपास केल्याचे आढळून आले़ याबाबत एमआयडीसी पोलिसात तक्रार देण्यात आली आह. एमआयडीसी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता  त्यात चोरटे दिसून आले आहे़ त्यानुसार फुटेज ताब्यात घेत पोलीस चोरट्याच्या शोधार्थ आहे़

पिंप्राळ्यात दुकान फोडले; ४३ हजारांचा ऐवज लंपास
पिंप्राळ्यात असलेल्या सोमाणी मार्केटमधील एक दुकान फोडून ४३ हजार रूपये किंमतीची साऊंड सिस्टिम चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघड झाली आहे़ याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़  पिंप्राळा येथे प्रयास मित्र मंडळ आहे़ चंद्रकांत महाजन यांच्या मालकीचे सोमाणी मार्केटमधील दुकान हे या मंडळाने भाड्याने घेतले आहे़ त्याठिकाणी मंडळाची संपूर्ण साऊंड सिस्टिीम ठेवण्यात आली होती़ मात्र, बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकाने कुलूप तोडून २ स्पीकर, ४ माईक, साऊंड सिस्टिम, एम्प्लीफायर, २५ पहार आदी सुमारे ४३ हजारांचा ऐवज लंपास केला़ गुरूवारी सकाळी ८ वाजता गावातील रवींद्र कोळी यांच्या लक्षात येताच त्यांनी मंडळाचे अध्यक्ष विकास चौधरी यांना कळविले़ नंतर मंडळांच्या अध्यक्षांसह कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता चोरी झाल्याचे निष्पन्न झाले़ त्यानंतर विजय नाथजोगी यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Protected Content