सर्व १९ संशयितांचे नमुने निगेटीव्ह

जळगाव प्रतिनिधी । आज कोरोनाचे संशयित म्हणून १९ जणांचे पाठविण्यात आलेले नमुने निगेटीव्ह आल्याची माहिती प्रशासनाने जाहीर केली आहे.

जिल्हा रूग्णालयातर्फे आज १९ जणांचे नमुने धुळे येथे कोव्हीड विषाणूच्या तपासणीसाठी पाठविले होते. यातील सर्वच्या सर्व म्हणजे १९ जणांचेही नमुने निगेटीव्ह आले आहेत. दरम्यान, जिल्हा रूग्णालयात एका पॉझिटीव्ह रूग्णावर उपचार सुरू असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना केल्या असून याला आता नागरिकांचा प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून येत आहे.

Protected Content