Home Cities जळगाव जळगावात डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात धन्वंतरी जयंती साजरी

जळगावात डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात धन्वंतरी जयंती साजरी

0
1

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशन संचालित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, जळगाव येथे भगवान धन्वंतरी जयंती अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या प्रसंगी पारंपरिक पद्धतीने पूजन व स्तवन पठण करून उपस्थितांनी समाजासाठी समर्पित आरोग्यसेवेचा संकल्प केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले यांच्या हस्ते भगवान धन्वंतरी यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर सर्व उपस्थितांनी सामूहिकरीत्या धन्वंतरी स्तवनाचे पठण करत सर्वांना उत्तम आरोग्य, निरोगी आणि दीर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना केली. या सोहळ्याला महाविद्यालयातील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयुर्वेदाचे आराध्य दैवत असलेले भगवान धन्वंतरी हे आरोग्याचे प्रतीक मानले जातात. आयुर्वेद ही केवळ आजारांवरील उपचारपद्धती नसून निरोगी जीवनशैलीचा एक परिपूर्ण मार्ग आहे, हे महत्त्व यावेळी वक्त्यांनी अधोरेखित केले. उपस्थितांनी समाजाच्या आरोग्यरक्षणासाठी आणि वैद्यकीय सेवेसाठी सदैव तत्पर राहण्याचा पुनरुच्चार केला.
याप्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांना भगवान धन्वंतरी जयंती तसेच दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. आयुर्वेदाच्या प्राचीन परंपरेचे जतन करणे आणि समाजाला निरोगी जीवनाची दिशा देणे हा संदेश देत संपूर्ण सोहळा उत्साहात पार पडला.


Protected Content

Play sound